SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'अकवान' चक्रीवादळामुळं देशात हाय-अलर्ट, महाराष्ट्रासाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे, 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 20, 2026, 06:50 IST | Updated: Nov 20, 2026, 06:52 IST
Image Credit: Maharashtra Weather update Cyclone Akvan Landfall Today 24 hrs imp for maharashtra alert in kokan
Join

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अकवान चक्रीवादळामुळं 11 राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील चार आठवडे हा पाऊस राहू शकतो, असा अंदाजही हवामान विभागाने सांगितला आहे. अकवान चक्रीवादळ आज शुक्रवारी दुपारी आंध्र प्रदेशच्या नरसापूर आणि ओडिसाच्या पुरी समुद्र किनाऱ्यादरम्यान धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अकवान चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेकडे वेगाने सरकत आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी 20 नोव्हेंबरला दुपारी नरसापूर आणि पुरीच्या काही किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. अकवान चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता आहे. पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे.

अकवान चक्रीवादळ 15 किमी प्रति तास या वेगाने पुढे सरकतय. सध्या चक्रीवादळ उत्तर-पश्चिमेकडे वेगाने सरकतंय. वादळ धडकण्याच्या दरम्यान वाऱ्याचा वेग 90-100 किमी प्रति तास इतका असेल. तसंच, वादळी वारे 110 किमी प्रति तास या वेगानेही वाऱ्याचा झोत येण्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात 0.5 ते 1 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

8 राज्यात पुढील चार आठवड्यात पावसाची शक्यता

'अकवान'  चक्रीवादळामुळे 8 राज्यांमध्ये पुढील चार आठवड्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेषतः ओडिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. 19 ते 26 नोव्हेंबर दरम्यान ओडिशा व
गंगा नदीचे प. बंगाल खोरे, केरळ, तामिळनाडू, झारखंड, आसाम. येथे पाऊस होईल.

26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर : केरळ,
तामिळनाडू, द. कर्नाटकातील काही भाग व आंध्र प्रदेश.

3 ते 10 डिसेंबर : द. भारत,
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल.

10 ते 17 डिसेंबर : तामिळनाडू,
केरळ, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES