रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार; सरकारची भाडेवाढीला मंजुरी
रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये होणार आहे. तर, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार आहेत. तामिळनाडू सरकारने या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.
तामिळनाडू सरकार : भारतात महागाईचा आगडोंब उसळला आहे. खाद्यपदार्थ, पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. बस, रिक्षा यांच्या प्रवास भाड्यात वाढ झाली आहे. रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये करण्यात आले आहे. तर, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये द्यावे लागणार आहेत. तामिळनाडूमध्ये ही दुप्पट भाडे वाढ लागू करण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारने या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.
तामिळनाडू सरकारने तब्बल 15 वर्षांनंतर राज्यातील ऑटो भाड्यांमध्ये सुधारणा केली आहे. तामिळनाडूतील ऑटो चालक सातत्याने भाडे वाढ करण्याची मागणी करत होते. दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर सरकारने अखेर भाडेवाढीची मागणी मंजूर केली आहे.
तामिळनाडू मध्ये ऑटो रिक्षाचे नवी दर लागू झाले आहेत. नवीन नियमांनुसार पहिल्या 1.8 किलोमीटरसाठी 50 रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतर, प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
वेटिंग आणि नाईट चार्ज किती असेल?
सरकारने किमान घाट भाडं 1.2 पट निश्चित केले आहे. मूळ भाडे 60 रुपये आणि अतिरिक्त वेटिंग चार्ज प्रति किलोमीटर 30 रुपये आहे. सुधारित दरांनुसार, रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंतचे भाडे नियमित भाड्याच्या दीडपट असेल. प्रति मिनिट 1 रुपया प्रतीक्षा शुल्क देखील आकारण्यात आले आहे.
सरकारने भाडे वाढीची अधिसूचना काढली आहे. यात सर्व सुधारित भाड्यांचे दर नमूद करण्यात आले आहेत. स्वतंत्र घटक म्हणून प्रतीक्षा शुल्क, रात्रीचे भाडे आणि घट शुल्क नमूद केले आहेत. राज्य परिवहन प्राधिकरण आणि संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला चेन्नई महानगर क्षेत्र आणि तामिळनाडूच्या इतर भागांमध्ये चालणाऱ्या ऑटो रिक्षांसाठी लागू दर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या भाडेवाढीमुळे रिक्षा प्रवासकरणाऱ्यांचा खिसा रिकामा होणार आहे.