SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एका कंपनीचे 5100 कर्मचारी एका रात्रीत अब्जाधीश झाले; डायरेक्ट 930 कोटींचे मालक बनले

AI कंपनी अँथ्रोपिकचे जवळपास 96 टक्के कर्मचारी करोडपती झाले आहेत. कंपनीचा प्रत्येक नववा कर्मचारी अंदाजे 930 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक झाला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 21, 2026, 23:53 IST | Updated: Nov 21, 2026, 23:57 IST
Join

अँथ्रोपिक : AI मुळे जगभरातील लाखो लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. तर, दुसरीकडे अँथ्रोपिक नावाच्या एआय कंपनीचे   5100 कर्मचारी एका रात्रीत अब्जाधीश झाले आहेत. हे कर्मचारी  930 कोटींचे मालक बनले आहेत. अँथ्रोपिक कंपनीच्या शेअर बाजारातील लिस्टिंगनंतर तिच्या कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले आहे.  अँथ्रोपिकचे जवळपास ९६% कर्मचारी करोडपती झाले आहेत. 

अँथ्रोपिक आयपीओने  अमेरिकन शेअर बाजारात शानदार पदार्पण केले. अँथ्रोपिक शेअर नॅसडॅकवर 111.50 डॉलरवर सूचीबद्ध झाला. 83 डॉलरच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर किमतीपेक्षा जवळपास 34% अधिक आहे. या प्रभावी सूचीकरणासह, अँथ्रोपिकने 81.3 अब्ज  डॉलर उभारले असून, जगातील सर्वात मोठ्या आयपीओचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम स्पेसएक्सच्या नावावर होता.

एलॉन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सने जून 2026 मध्ये 75 अब्ज डॉलर्स उभारून जगातील सर्वात मोठ्या आयपीओचा विक्रम प्रस्थापित केला, जो अवघ्या पाच महिन्यांनंतर अँथ्रोपिकने 81.3 अब्ज डॉलर्स उभारून मोडला.

कर्मचाऱ्यांवर पैशांचा पाऊस

अँथ्रोपिकच्या शेअर बाजारातील विक्रमी प्रवेशामुळे त्याच्या हजारो कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले असून, त्यापैकी अनेक जण आता लक्षाधीश झाले आहेत. 'क्लॉड' नावाचा एआय चॅटबॉट बनवणाऱ्या कंपनीत सप्टेंबरपर्यंत अंदाजे 5,300 कर्मचारी होते. आता यापैकी जवळपास सर्व कर्मचाऱ्यांकडे 10 लाख डॉलर्स भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 8.4 कोटी रुपये पेक्षा जास्त किमतीचे शेअर्स असल्याचा अंदाज आहे.
अँथ्रोपिकमधील अंदाजे 5,100 कर्मचाऱ्यांकडे एकूण कर्मचाऱ्यांपैकी 96 टक्के 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे समभाग आहेत. अंदाजानुसार, अंदाजे 2,800 कर्मचाऱ्यांकडे 1 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे समभाग आहेत.  तर अंदाजे 600 कर्मचाऱ्यांकडे 10 कोटी डॉलर्सपेक्षा अंदाजे 840 कोटी रुपये जास्त किमतीचे समभाग आहेत.

इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ

एआय कंपनी अँथ्रोपिकचा आयपीओ हा वॉल स्ट्रीट आणि जागतिक तंत्रज्ञान इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचा दावा केला आहे. 10 नोव्हेंबर 2026 रोजी सुरू झाला आणि 17 नोव्हेंबर 2026 रोजी बंद झाला. या कालावधीत, सामान्य गुंतवणूकदार आणि मोठ्या कंपन्या या दोघांनीही जोरदार बोली लावून एकूण 107.3 अब्ज डॉलर्स उभारले. 

कंपनीने सुरुवातीला प्रति शेअर 70 ते 78 डॉलर्सचा किंमत पट्टा निश्चित केला होता. परंतु मागणीमुळे तो प्रति शेअर 83 डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आला. आयपीओमध्ये 980 दशलक्ष शेअर्स विकले गेले, ज्यामुळे कंपनीला 81.34 अब्ज डॉलर्स उभारण्यास मदत झाली.  बाजार मूल्याच्या बाबतीत, अँथ्रोपिकने एकाच दिवसात सौदी अरामको, ब्रॉडकॉम, मेटा आणि टेस्ला यांसारख्या जागतिक दिग्गजांना मागे टाकले आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES