SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

‘खा, प्या आणि मजा करा’ ही भारतीय संस्कृती नाही;सेव्हिंग करा' पंतप्रधान मोदींनी दिला सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना बचतीची सवय वाढवण्याचे आवाहन केले. नशामुक्त भारत आणि नक्षलवाद पुन्हा रोखण्याबाबतही बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 19, 2026, 14:07 IST | Updated: Nov 19, 2026, 14:16 IST
Image Credit: पंतप्रधान मोदी
Join

देशात आर्थिक प्रगती होत असताना नागरिकांनी बचतीची सवयही कायम ठेवावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. ‘खा, प्या आणि मज्जा करा’ ही भारतीय संस्कृती नाही, असे सांगत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना आणि सरकारी सचिवांना बचतीला प्रोत्साहन दिले. केंद्रीय मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदी यांनी हा मुद्दा मांडला. गरिबीतून बाहेर पडलेल्या कुटुंबांनी अनियंत्रित खर्चामुळे पुन्हा आर्थिक संकटात जाऊ नये, ही त्यामागची चिंता असल्याचे बैठकीतील सूत्रांनी सांगितले. या बैठकीत नशामुक्त भारताचे उद्दिष्ट आणि नक्षलवादाचा धोका पुन्हा निर्माण होऊ न देण्यावरही चर्चा झाली. काय म्हणाले पंतप्रधान मोदी? सविस्तर जाणून घेऊया.

‘बचतीची सवय वाढवा’, मोदींचा मंत्र्यांना संदेश

पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना आणि सरकारी सचिवांना नागरिकांमध्ये बचतीची सवय वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. केवळ उत्पन्न वाढणे पुरेसे नसून मिळालेल्या पैशांचे योग्य नियोजन आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रणही महत्त्वाचे आहे, असा या आवाहनाचा आशय आहे.

'50 कोटी लोक गरिबीतून बाहेर'

2011 ते 2023 या काळात भारताने गरिबी कमी करण्याच्या बाबतीत वेगाने प्रगती केल्याचा उल्लेख मोदी यांनी बैठकीत केला. जवळपास 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले असून ही कामगिरी सरकार, प्रशासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्र आणि सामान्य नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

नशामुक्त भारत हे पुढचे लक्ष्य

गरिबी कमी करण्यासाठी आणि नक्षलवादाचा प्रभाव संपवण्यासाठी सामूहिक प्रयत्न यशस्वी ठरले, तर अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधातही देश एकत्रितपणे लढू शकतो, असे मोदी यांनी बैठकीत सांगितले. तरुण पिढीला व्यसनांपासून वाचवणे अत्यंत आवश्यक असून नशामुक्त भारत हे प्रत्येक नागरिकाचे वैयक्तिक ध्येय बनले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

नक्षलवाद पुन्हा वाढू नये, यासाठी दक्षता

भारताने 31 मार्च 2026 रोजी नक्षलवादाच्या प्रभावातून मुक्त होण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र, हा धोका पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी ‘नक्षलमुक्त भारत’ या विषयावर सादरीकरण केले.

सायबर गुन्ह्यांवरही चर्चा

या बैठकीत वित्त, ग्रामीण विकास, पंचायतराज, गृहनिर्माण आणि मत्स्यव्यवसाय यांसह विविध मंत्रालयांतील 11 सचिवांनी सादरीकरण केले. गरिबी कमी करण्यासाठी सरकारकडून राबवण्यात आलेले प्रयत्न आणि विविध विभागांचे योगदान यावर माहिती देण्यात आली. याशिवाय सायबर गुन्हे आणि ऑनलाइन आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES