SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारतात सोनं चांदी इतक्या प्रचंड प्रमाणात स्वस्त का झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर कार्यक्रमात मोठा खुलासा; प्रत्येक भारतीयाला आश्चर्यचकित करणारे कारण

भारतात सोनं चांदीचे प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं चांदीचे दर का घरसले आहेत. याचा खुलासा केला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 21, 2026, 20:36 IST | Updated: Nov 21, 2026, 20:37 IST
Join

PM Narendra Modi On Gold : भारतात प्रचंड प्रमणात सोनं चांदी स्वस्त झाले आहे. सोन्याचे दर उच्चांकी दरावरुन जवळपास 60 हजार रुपयांनी घसरले आहेत. तर, चांदी देखील 2.50 लाखांपेक्षा जास्त रुपयांनी स्वस्त झाली आहे. जगभरात घडणाऱ्या आर्थिक घडामोडींवर सोनं चांदीच्या दरावर दबाव येत असल्याचे सांगितले जात आहे. अशातच   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात सोनं चांदी इतक्या प्रचंड प्रमाणात का स्वस्त झाले आहे याचा जाहीर कार्यक्रमात एक मोठा खुलासा केला आहे. 

लखनौमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित एका कार्यक्रमात आयटीआयच्या तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं चांदीच्या दरात होत असलेल्या घरसणीवर भाष्य केले. याबद्दल बोलताना त्यांनी देश वासियांना केलेल्या आवाहनाचा उल्लेख केला. 

गेल्या वर्षी मी देशातील लोकांना एक वर्ष सोने किंवा चांदी खरेदी करू नका असे आवाहन केले होते. सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील लोकांनी माझा सल्ला ऐकला. आज त्याचे परिणाम दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी त्यांनी देशवासियांना, अत्यंत गरज असल्याशिवाय वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी लोकांनी त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवली होती. पण आता, सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे, अनेक लोक त्यांना सांगत आहेत की त्यांचा सल्ला ऐकल्यामुळे त्यांचे पैसे वाचले असे पंतप्रधान मोदी म्हणाले .

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या आवाहनाची तुलना माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आवाहनाशी केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शास्त्रीजींनी देशवासियांना दिवसातून एक वेळचे जेवण टाळण्याचे आवाहन केले होते. देशाने त्यांचे म्हणणे ऐकले होते. माी केलेल्या कमी सोने खरेदी करण्याच्या आवाहनावरही देशवासियांनी विश्वास ठेवला असे मोदींनी भाषणात नमूद केले. 

पंतप्रधान मोदींचा तरुणांना सल्ला

भारताचे भविष्य आयटीआय विद्यार्थ्यांच्या हातात आहे. त्यांच्या कौशल्यांमध्येच देशाची ताकद आहे असं पंतप्रधान म्हणाले. एआयमुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने त्याबद्दल अनेक चिंता व्यक्त केल्या जात आहेत. मात्र, ज्यांच्याकडे कौशल्य आहे, त्यांचा रोजगार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थांना दिला.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES