SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मार्क्स कमी करीन’ म्हणत विद्यार्थिनीवर दबाव? शिक्षक पाठवायचा नको ते मेसेज; व्हॉट्सअ‍ॅप चॅटमुळे प्रकरण उघड

मध्य प्रदेशातील गुना येथे बारावीच्या विद्यार्थिनीला आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवल्याचा शिक्षकावर आरोप आहे. शिक्षकाने तिला कमी गुण देण्याची धमकी दिली. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 24, 2026, 21:41 IST | Updated: Nov 24, 2026, 21:54 IST
Image Credit: विद्यार्थीनीवर वाईट नजर
Join

मध्य प्रदेशातील गुना येथे सरकारी गर्ल्स स्कूलमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथील शिक्षकाने बारावीच्या विद्यार्थिनीला व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवला. यानंतर एकट्याने भेटण्याचा दबाव आणल्याचा गंभीर आरोप आहे. विद्यार्थिनीने विरोध केल्यानंतर परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी दिली. विद्यार्थीनीने तक्रारीत याची माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

सरकारी शाळेतील शिक्षकावर आरोप

गुना शहरातील कॅन्ट परिसरातील पीएमश्री गर्ल्स उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. नरेंद्र कुशवाह असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बारावीच्या एका विद्यार्थिनीने त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. शिक्षकाने काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर वारंवार आक्षेपार्ह मेसेज पाठवत असल्याचा आरोप विद्यार्थिनीने केलाय.

एकटीला भेटण्यासाठी बोलावलं

शिक्षक तिला बाहेर फिरायला जाण्यासाठी आणि एकट्याने भेटण्यासाठी सांगत होता. त्यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याचेही विद्यार्थीनीने तक्रारीत नमूद केलंय.

परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी?

विद्यार्थिनीने शिक्षकाच्या वागण्याला विरोध केल्यानंतर परीक्षेत कमी गुण देण्याची आणि अभ्यासाचे नुकसान करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. शाळेतील सर्व गोष्टी आपल्या हातात असल्याचे सांगून शिक्षक दबाव आणत असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनीला आपल्या शैक्षणिक भवितव्याची चिंता वाटू लागल्याचे वृत्त आहे.

आईकडे तक्रार

सततच्या संदेशांमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीने अखेर आईला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर आईने शाळेचे प्राचार्य, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. तक्रारीसोबत व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉटही सादर करण्यात आले. प्राचार्य संजय कुमार जैन यांनी तक्रार मिळाल्यानंतर ती चौकशीसाठी शिक्षण विभागाकडे पाठवल्याचे सांगितले.

शाळेच्या आवारात स्वतंत्र जागेचा आरोप

शिक्षकाने शाळेच्या आवारात पडदा लावून स्वतंत्र जागा तयार केली होती आणि तिथे बसून बोलण्यासाठी विद्यार्थिनीवर दबाव आणत होता, असा आणखी एक आरोप तक्रारीत आहे. इतर विद्यार्थिनींसोबतही असे प्रकार होत असल्याची शंका तिने व्यक्त केलीय.

पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा

विद्यार्थिनीची तक्रार आणि उपलब्ध व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे गुना पोलिसांनी नरेंद्र कुशवाह याच्याविरोधात पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलीय. शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडूनही पुढील कारवाई काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES