प्रायव्हेट फोटो, विवस्त्र डान्स, अंगभर लिपस्टिक अन् तासंतास...; शिवा शर्मा ठरला श्रद्धाच्या क्रूरतेचा बळी, धक्कादायक खुलासे समोर
शिवा शर्मा मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. श्रद्धा दुबेनं शिवाला अतिशय क्रूरतेने त्याचा छळ केल्याचं समोर आलं आहे.
बहुचर्चित आणि लखनऊमधील कोट्यधीश व्यावसायिक शिवा शर्मा हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. या हत्याकांडात मॉडेल श्रद्धा दुबे , तिची बहीण रश्मी दुबे, चालक तन्वीर अली ऊर्फ दानिश अटकेत आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शिवाच्या मृत्यूपूर्वी त्याला अतिशय मानसिक आणि शारीरिक छळ झालंय समोर आलंय. शिवा शर्मासोबत 9 ऑक्टोबरच्या रात्री भयानक कांड झाला होता. त्या रात्री नेमकं काय झालं होतं याबद्दल सत्य समोर आलंय.
त्या 9 ऑक्टोबरच्या रात्री शिवासोबत काय घडलं?
श्रद्धा, तिची बहीण रश्मी आणि ड्रायव्हर तनवीर उर्फ दानिश यांची चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांना 6 तासांच्या चौकशीत त्या रात्रीच्या कृत्याबद्दल समजल्यावरही तेही चक्रावून गेलेत. लखनऊमधील हजरतगंज इथल्या अवध ग्रीन अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भयानक कांड घडलं होतं. 9 ऑक्टोबरच्या रात्र शिवासाठी काळरात्र ठरली. श्रद्धा, रश्मी आणि तनवीर उर्फ दानिश यांनी त्या रात्रीची संपूर्ण काहा मी सांगितली.
पोलिसांनी सांगितलं की, शिवाकडून भरमसाठ पैसे उकळण्यासाठी त्या रात्री त्यासोबत भयानक कृत्य करण्यात आले. त्या रात्री श्रद्धाने शिवाला अंगावरील संपूर्ण कपडे काढायला सांगितले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाहीतर त्याच्या अंगावर लिपस्टिकचे मार्क लावण्यात आले. त्यानंतर शिवाला सर्वांसमोर विवस्त्र डान्स करायला सांगितलं. यापूर्वीही झालेल्या चौकशीत श्रद्धाने याबद्दल कबुली दिली होती. पण धक्कादायक म्हणजे त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी सिगरेटचे चटके देखील देण्यात आले.
धक्कादायक म्हणजे तपासातून असं समोर आलं की, धक्कादायक श्रद्धाने हे फक्त शिवासोबत 9 ऑक्टोबरच्या रात्री केलं नव्हतं. तिने हे अनेक वेळा शिवाला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला होता.