SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारतातील 12 राज्यांमधील 32 विद्यापीठांबाबत धक्कादायक माहिती उघड; शिक्षण क्षेत्रात खळबळ! पालक आणि विद्यार्थ्यांची झोप उडाली

भारतातील 12 राज्यांमधील 32 विद्यापीठांबाबत अत्यंत महत्वाची माहिती UGG ने प्रसिद्द केली आहे. तसेच या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच प्रवेश घेणाऱ्याविद्यार्थ्यांना अलर्ट केले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 21, 2026, 22:20 IST | Updated: Nov 21, 2026, 22:23 IST
Join

UGG : भारताच्या शइक्षण क्षेत्रात खळबळ माजवणारी अपडेट सोमर आली आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांना पुन्हा एकदा अलर्ट केले आहे. भारतातील 12 राज्यांमधील 32 विद्यापीठांबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यामुळे ज्यांनी या 32 विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे. किंवा जे कोणी यात प्रवेश घेण्याचा विचार करत आहेत त्यांनी या विद्यापीठाची पडताळणी करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

17 नोव्होर 2026 रोजी यूजीसीने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. कोणत्याही महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी, त्यांनी त्या संस्थेची मान्यता आणि पदवी प्रदान करणाऱ्या प्राधिकरणाची पडताळणी करावी. प्रवेश घेण्यापूर्वी किंवा शुल्क भरण्यापूर्वी, संबंधित अभ्यासक्रम चालवण्यासाठी संस्थेला मान्यता आहे की नाही, याची पडताळणी करावी. याव्यतिरिक्त, त्यांनी संस्थेची मान्यता आणि कायदेशीर स्थितीची देखील पडताळणी करावी असे  यूजीसीने या परिपत्रकात म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 9 ऑक्टोबर 2026 रोजीच्या आदेशानुसार ही सूचना जारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि आर्थिक बाबी सुरक्षित ठेवण्यासाठी, संबंधित प्राधिकरणांना आणि संस्थांना या सूचनेचा व्यापक प्रचार करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) दिले आहेत.

12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 32 संस्था

यूजीसीच्या वेबपेजवर 'बनावट विद्यापीठांची यादी' नावाचे एक सेक्शन आहे. यात 32 नोंदी आहेत. फेब्रुवारी 2026 पर्यंत या विद्यापीठांची नोंदणी  वैध आहे. संस्था कायदेशीररित्या स्थापित आहे का, पात्रता प्रदान करण्यास अधिकृत आहे का आणि तिच्याकडे आवश्यक वैधानिक मान्यता आहेत का, याची पडताळणी करावी असे अवाहन यूजीसीने अर्जदारांना  केले आहे. तसेच, केवळ जाहिराती, वेबसाइट्स, माहितीपत्रके किंवा सोशल मीडियामधील दाव्यांवर अवलंबून राहू नये, असा इशाराही दिला आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क भरण्यापूर्वी किंवा प्रवेश घेण्यापूर्वी, यूजीसीच्या अधिकृत नोंदी आणि संबंधित नियामक प्राधिकरणाकडून आपल्या मान्यतेची पडताळणी करावी. 

UGC ने प्रसिद्ध केलेली राज्यनिहाय यादी

आंध्र प्रदेश- ख्रिस्त न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी, बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया
अरुणाचल प्रदेश- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन
दिल्ली- माउंटन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी ऑफ वर्ल्ड पीस, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्युशन्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस, कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, व्होकेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ-एम्प्लॉयमेंट, अध्यात्मिक विश्वविद्यालया
हरियाणा- मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी
झारखंड- दक्ष युनिव्हर्सिटी
कर्नाटक- ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी, सर्व भारतीय शिक्षा पीठ
केरळ- इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ प्रोफेटिक मेडिसिन, सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी
महाराष्ट्र- राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नॅशनल बॅकवर्ड ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी
पुदुचेरी- उषा लच्छुमानन कॉलेज ऑफ एज्युकेशन, श्री बोधी ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन
राजस्थान- राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट
उत्तर प्रदेश- गांधी हिंदी विद्यापीठ, नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यापीठ, भारतीय शिक्षा परिषद, महामाया तांत्रिक विद्यापीठ
पश्चिम बंगाल - भारतीय पर्यायी औषध संस्था, पर्यायी औषध आणि संशोधन संस्था

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES