SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल झाल्यावरही तब्बल 463 किमी धावली; रेल्वेकडून स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

ब्रेक फेल झाल्यावरही वंदे भारत ट्रेन तब्बल 463 किमी धावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लोको पायलटच्या इशाराही यात दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसतंय. यावर रेल्वेकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 16, 2026, 10:34 AM IST | Updated: Nov 16, 2026, 10:38 AM IST
Image Credit: Vande Bharat train
Join

आसाममध्ये कोलकाता - सायरंग एक्स्प्रेसला अपघात झाल्यानंतर रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चेत आला आहे. अशात सोशल मीडियावर वंदे भारत एक्स्प्रेसचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील लोको पायलटच्या इशाराकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलण्यात आलं. या व्हिडीओनुसार वंदे भारत एक्स्प्रेसचे ब्रेकिंग सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानंतर म्हणजे ब्रेक फेल झाल्यानंतर ट्रेन तब्बल 463 किमी धावल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात भारतीय रेल्वेकडून चौकशी करण्यात आली. तर त्यातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

रेल्वेकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलं?

वंदे भारत रेल्वे ब्रेक फेल व्हिडीओबद्दल रेल्वेकडून सांगण्यात आलंय की, वंदे भारतचा हा व्हिडीओ 24 ऑक्टोबरचा आहे.  रेल्वेकडून सांगितलं गेलं की, ब्रेक फेल झाल्यानंतर ही वंदे भारत झारखंडमधील हटियाहून उत्तर प्रदेशातील झाशीपर्यंत नेण्यात आली. रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं की, या ट्रेनमध्ये ब्रेक फेल झाल्यानंतर एकही प्रवासी नव्हता. तसंच ट्रेनला मालगाडीचं इंजिनही जोडण्यात आलं होतं.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, वंदे भारतच्या ब्रेक फेल झाल्यानंतर त्याला मालगाडीच्या इंजिनची ब्रेकिंग सिस्टीम लावण्यात आली होती. ज्यामुळे ट्रेन सुरक्षितपणे ठराविक जागी नेण्यात आली. त्यानंतर 7 नोव्हेंबरला मिळालेल्या आदेशानुसार हटिया इथून ट्रेन रवाना झाल्यानंतर लोको पायलटने हटिया-रांची मार्गावर ब्रेक फेल आणि ब्रेक पॉवरची चाचणी करण्यात आली होती.

 

 

त्यावेळी  रेल्वे कर्मचाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली की, सेक्शन कंट्रोलर आणि ट्रॅक्शन लोको कंट्रोलरसह ब्रेकिंग क्षमता अत्यंत कमी आणि प्रभावहीन आहे. तरीही ट्रेनला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे आदेश देण्यात आले. या तक्राराची दखल उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील दीनदयाळ उपाध्याय यांनी घेतली आहे. तक्रारीनंतर ट्रेनची तपासणी करण्यात आली तेव्हा समोर आलं की, ट्रेनच्या सर्व डब्यांची ब्रेकिंग सिस्टीम वेगळी असल्याने डब्यांना ब्रेक लागत नव्हतं. दरम्यान  ब्रेकिंग क्षमतेबाबत आधीच सांगण्यात आलं असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांनी योग्य कारवाई केली नाही, असं रेल्वेच्या आदेशातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES