आयोगाला स्थापनेपासून 18 महिन्यांत शिफारशी सादर करायच्या आहेत. सध्या कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि विविध घटकांशी चर्चा सुरू आहे.
आठव्या वेतन आयोगात ₹25 हजार मूळ पेन्शन किती होऊ शकते? 2.5, 3 आणि 3.5 फिटमेंट फॅक्टरनुसार पेन्शनवाढीचे गणित, सातव्या वेतन आयोगाचा नियम आणि महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
1/7
8th Pay Commission: ₹25 हजारांची पेन्शन थेट ₹87500 होणार? पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट समोर!
केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. वेतनवाढीसोबतच पेन्शनमध्ये किती वाढ होणार, याची उत्सुकता आहे. महागाई, औषधोपचार आणि दैनंदिन खर्च वाढत असल्याने पेन्शनधारकांसाठी हा आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. कर्मचारी संघटनांनी किमान पेन्शन वाढवणे, कौटुंबिक पेन्शनमध्ये सुधारणा करणे आणि महागाईपासून दिलासा देण्याच्या मागण्या आयोगासमोर मांडल्या आहेत.
2/7
₹25 हजारांची मूळ पेन्शन ₹87500 कशी होऊ शकते?
सध्या एखाद्या केंद्रीय निवृत्त कर्मचाऱ्याची मूळ पेन्शन 25 हजार रुपये असल्याचे गृहीत धरूया. आठव्या वेतन आयोगाने 3.5 फिटमेंट फॅक्टर स्वीकारल्यास 25 हजारांना 3.5 ने गुणावे लागेल. त्यानुसार नवीन मूळ पेन्शन 87500 रुपये होऊ शकते. मात्र, हा केवळ गणिती अंदाज आहे. आठव्या वेतन आयोगाने अद्याप कोणताही फिटमेंट फॅक्टर निश्चित केलेला नाही. त्यामुळे ही वाढ निश्चित समजू नये.
3/7
5 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास किती पेन्शन मिळेल?
जर आयोगाने 2.5 फिटमेंट फॅक्टर स्वीकारला, तर 25 हजार रुपयांची मूळ पेन्शन 62500 रुपये होईल. त्याचप्रमाणे 30 हजार रुपयांची पेन्शन 75 हजार रुपये आणि 40 हजार रुपयांची पेन्शन एक लाख रुपये होऊ शकते. हा पर्याय तुलनेने कमी फिटमेंट फॅक्टरवर आधारित आहे. मात्र, यालाही अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही.
4/7
3 फिटमेंट फॅक्टरनुसार पेन्शनचे गणित काय?
३ फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास 25 हजार रुपयांची मूळ पेन्शन 75 हजार रुपये होईल. 35 हजार रुपयांची पेन्शन 1 लाख 5 हजार रुपये, तर 50 हजार रुपयांची पेन्शन 1 लाख 50 हजार रुपये होऊ शकते. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये होणारा बदल अंतिम पेन्शनच्या रकमेत मोठा फरक निर्माण करू शकतो.
5/7
3.5 फिटमेंट फॅक्टर लागू झाल्यास सर्वाधिक किती फायदा?
3.5 फिटमेंट फॅक्टरच्या गणितानुसार 25 हजार रुपयांची मूळ पेन्शन 87500 रुपये, 35 हजारांची 1 लाख 22 हजार 500 रुपये, तर 50 हजारांची मूळ पेन्शन 1 लाख 75 हजार रुपये होऊ शकते. त्यामुळे 3.5 फिटमेंट फॅक्टरची शक्यता पेन्शनधारकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
6/7
सातव्या वेतन आयोगात पेन्शन कशी निश्चित करण्यात आली होती?
सातव्या वेतन आयोगाच्या काळात 1 जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पुनर्निश्चितीसाठी दोन पर्याय होते. पहिल्या पर्यायात निवृत्तीच्या वेळच्या वेतनानुसार संबंधित कर्मचाऱ्याचे काल्पनिक वेतन सातव्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्समध्ये निश्चित करून पेन्शन ठरवण्यात येत होती. दुसऱ्या पर्यायात सध्याच्या पेन्शनला 2.57 या फिटमेंट फॅक्टरने गुणण्याचा प्रस्ताव होता.
7/7
अंतिम निर्णय कधी होणार?
आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी झाली. आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाला स्थापनेपासून 18 महिन्यांत शिफारशी सादर करायच्या आहेत. सध्या कर्मचारी संघटना, पेन्शनधारक आणि विविध घटकांशी चर्चा सुरू आहे. आयोगाच्या शिफारशी आल्यानंतर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेईल.