• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /क्लासिक Looks अन् मॉर्डन फिचर्स... ब्लूटूथपासून USB पर्यंत सारं काही! 500 CC च्या नव्या बाईकचे फिचर्स, किंमत जाणून घ्या

क्लासिक Looks अन् मॉर्डन फिचर्स... ब्लूटूथपासून USB पर्यंत सारं काही! 500 CC च्या नव्या बाईकचे फिचर्स, किंमत जाणून घ्या

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 25, 2026, 14:03 IST|Updated: Nov 25, 2026, 14:47 IST
joinshare
क्लासिक लूक असलेल्या एखाद्या बाईकच्या शोधात तुम्ही आहात का? याचसंदर्भात तुम्ही नवा पर्याय शोधत असाल तर होंडाची नवी बाईक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरु शकते. जाणून घ्या या बाईकचे फिचर्स, किंमत आणि इतर तपशील...

ही बाईक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या बाईकची किंमत किती? त्यात काय फिचर्स आहेत? जाणून घ्या सविस्तरपणे...

hondacb5001/9

नव्या आणि जुन्याचा सुरेख मेळ... जाणून घ्या या न्यू लाँच बाईकबद्दल...

तुम्ही एखादी छान, आरामदायी पण क्लासिक लूक असणारी बाईक शोधत असाल तर तुमचा शोध या बाईकवर संपू शकतो... जाणून घ्या या नव्या बाईकचे फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत किती याबद्दल...
hondacb5002/9

पॉवर आणि पीक टॉर्क किती?

501.7 सीसीचं सिंगल-सिलेंडर इंजिन एअर-कूल्ड (ऑइल कूलरसह) प्रकारातील आहे. हे इंजिन 28.14 पीएस पॉवर आणि 43.3 एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
hondacb5003/9

दुसऱ्या आणि तिसऱ्या व्हेरिएंटची किंमत किती?

दुसर्‍या व्हेरिएंटचं नाव 'स्पोक' असं असून ते 3 लाखांच्या एक्स शो-रुम प्राइजला उपलब्ध आहे. यामध्ये ट्यूबलेस टायर्ससह क्रॉस-स्पोक रिम्स देण्यात आल्यात. टॉप मॉडेलचं नाव 'स्पोक विथ स्ट्रीप्स' असं आहे. यामध्ये क्रॉस-स्पोक रिम्स आणि विशेष स्ट्राइप ग्राफिक्स असा पर्याय देण्यात आला असून या व्हेरिएंटची किंमत 3 लाख 2 हजार रुपये इतकी आहे. (सर्व फोटो होंडाच्या अधिकृत वेबसाईटवरुन साभार)
hondacb5004/9

बेस व्हेरिएंटची किंमत किती?

होंडा सीबी 500 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ₹2.75 लाखांपासून सुरू होते. 'एलॉय' नावाच्या बेस व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स पर्पल ब्लॅक, पर्पल डीप ग्राऊंड ग्रे रंगांच्या पर्यायासहीत देण्यात आलेत.
hondacb5005/9

कोणकोणते फिचर्स?

सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनल एबीएस, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी - ट्रॅक्शन कंट्रोल) आणि इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ईएसएस) यासारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये संपूर्ण एलईडी लाइटिंग आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट उपलब्ध आहे. गाडीमध्ये 15.2 लीटरची फ्युएल टँक आहे.
hondacb5006/9

मेड इन इंडिया बाईकचं नाव काय?

होंडाच्या या नव्या बाईकचं नाव आहे, होंडा सीबी 500! ही मेड इन इंडिया बाईक रेट्रो-रोडस्टर प्रकारातील आहे. 501.7 सीसीचे सिंगल-सिलेंडर इंजिन असलेल्या या बाईकचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात...
hondacb5007/9

लाँग ड्राइव्हसाठी आरामदायक

लो-रिव्हिंग म्हणजेच कमी आरपीएमवर जास्त टॉर्कच्या वैशिष्ट्यामुळे शहर आणि हायवेवरील लाँग ड्राइव्हसाठी ही बाईक आरामदायक असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 189 किलो वजन असलेल्या या बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स आणि असिस्ट-अँड-स्लिपर क्लच देण्यात आला आहे.
hondacb5008/9

विशेष फिचर्स

बाईकमधील विशेष फिचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या बाईकमध्ये ॲनालॉग-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असून, ब्लूटूथ आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसाठी होंडा रोडसिंक (Honda RoadSync) सपोर्ट उपलब्ध आहे.
hondacb5009/9

क्लासिक दिसणारी बाईक शोधत असाल तर...

तुम्ही एखादी क्लासिक दिसणारी बाईक शोधत असाल तर होंडाने तुमच्यासाठी एक नवा पर्याय उपलब्ध करुन दिली आहे. खरं तर या बाईकच्या माध्यमातून होंडाने थेट 500 सीसीची दुचाकी बाजारात उतरवली आहे, असं म्हणता येईल.
TAGS:
Auto News
Marathi News
News in Marathi

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

2

कात्रज प्रकरण नेमकं काय? ज्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळेला संपण्याचा झाला प्रयत्न!

3

धक्कादायक! 19 वर्षीय मुलीची आई-वडिलांकडून हत्या; गोळ्या खाऊनही मेली नाही म्हणून उशीने दाबलं तोंड, कारण त्याहून हादरवणारं, गर्भवती...

4

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; तीन महिने मोफत धान्य मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका, वाचा 14 निर्णय

5

सरकारी कर्मचारी बेपत्ता झाल्यास कुटुंबाला पेन्शन मिळते? ग्रॅच्युइटीपासून PF पर्यंतचे नियम जाणून घ्या

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.