भारतात येणाऱ्या चक्रीवादळाला दुसऱ्या देशाने सुचवलेलं नाव कसं दिलं जातं? चला, जाणून घेऊयात
चक्रीवादळाचा इशारा दिला की सर्वात आधी चर्चा होते ती त्याच्या नावाची! कधी तौक्ते, कधी निसर्ग, कधी बिपरजॉय, तर आता अर्णब आणि मुरासू! पण तुम्हाला माहितीये का, या चक्रीवादळांची नावं कोणी ठेवली? ही नावं ठेवण्यासाठी काही स्पर्धा होते का?
1/8
चक्रीवादळांची नावं कोण ठरवतं? भारतात आलेल्या वादळांना परदेशी नावं का?
हिंद महासागराच्या उत्तर भागात म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांची नावं ठरवण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय यंत्रणा काम करते.
2/8
WMO
याला WMO म्हणजेच जागतिक हवामान संघटना आणि ESCAP म्हणजेच Economic and Social Commission for Asia and the Pacific यांच्या संयुक्त पॅनेलची मान्यता आहे.
3/8
13 देशांचा समावेश
या पॅनेलमध्ये भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, थायलंड, म्यानमार, इराण, मालदीव, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन अशा 13 देशांचा समावेश आहे.
4/8
169 नावांची यादी
प्रत्येक देशाने चक्रीवादळांसाठी 13 नावं सुचवली आहेत. म्हणजेच एकूण 169 नावांची यादी तयार करण्यात आली आहे.
5/8
या नावांची निवड नेमकी कशी होते?
जेव्हा समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होते, तेव्हा यादीतील क्रमानुसार पुढील नाव त्या वादळाला दिले जाते. देशांच्या वर्णमालेनुसार या नावांचा वापर होतो.
6/8
अर्णब आणि मुरासू
महत्त्वाचं म्हणजे, चक्रीवादळ ज्या देशाच्या किनाऱ्यावर धडकणार आहे, त्या देशाचं नाव त्याला दिलं जात नाही. तर नावांच्या यादीत पुढे जे नाव येतं, तेच चक्रीवादळाला दिलं जातं. एकदा वापरलेलं नाव पुन्हा वापरलं जात नाही. आता याचं ताजं उदाहरण म्हणजे अर्णब आणि मुरासू
7/8
अर्णब
28 ऑक्टोबर 2026 रोजी अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडक दिली. विशेष म्हणजे अर्णब हे नाव भारताने नाही, तर बांगलादेशने सुचवलं होतं. बंगाली भाषेत अर्णबचा अर्थ समुद्र असा होतो.
8/8
आता दुसरं नाव आहे मुरासू!
मुरासू हे नाव भारताने सुचवलं आहे. तमिळ भाषेत मुरासू म्हणजे नगारा किंवा मोठा ढोल. पूर्वी नगाऱ्याच्या आवाजातून लोकांपर्यंत महत्त्वाचे संदेश आणि नैसर्गिक आपत्तींचे इशारे पोहोचवले जात असत. त्याच संकल्पनेतून हे नाव सुचवण्यात आलं. बंगालच्या उपसागरातील नव्या हवामान प्रणालीचं चक्रीवादळात रूपांतर झाल्यास त्याला मुरासू हे नाव दिलं जाणार आहे.