• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /महाराष्ट्रातील 10 मोठ्या जिल्हा बँका, सर्वात जास्त कमाई करणारी आणि सर्वात जास्त शाखा असलेल्या बँकेचे नाव जाणून चकित व्हाल!

महाराष्ट्रातील 10 मोठ्या जिल्हा बँका, सर्वात जास्त कमाई करणारी आणि सर्वात जास्त शाखा असलेल्या बँकेचे नाव जाणून चकित व्हाल!

Reported ByVanita Kamble
Published: Nov 03, 2026, 08:35 PM IST|Updated: Nov 03, 2026, 08:42 PM IST
joinshare
महाराष्ट्रातील 10 मोठ्या जिल्हा बँका कोणत्या? यांची कमाई किती? यांच्या शाखा किती?

Maharashtra TOP 10 big district banks : सध्या महाराष्ट्रात जिल्हा बँकांच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. स्थानिक राजकारण आणि अर्थकारणात जिल्हा बँकांच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात.  जिल्हा बँकेवर सत्ता मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळी प्रतिष्ठा पणाला लावतात. जिल्हा बँकावर ठराविक नेत्यांचे तसेच पक्षांचे, युती आघाड्या आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. जाणून घेऊया महाराष्ट्रातील 10 मोठ्या जिल्हा बँका कोणत्या. 

Maharashtra TOP 10 big district banks1/11

महाराष्ट्रातील 10 मोठ्या जिल्ह्या बँका

महाराष्ट्रातील 10 मोठ्या जिल्ह्या बँका कोणत्या आहेत. सर्वात जास्त उलाढाल असणारी बँक कोणती. सर्वात जास्त शाखा असलेली बँक कोणती जाणून घेऊया सर्वकाही.
solapur DCC bank2/11

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूरचा वस्त्रोद्योग तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधारस्तंभ मानली जाते. या बँकेची उलाढाल 4,800 कोटी पेक्षा जास्त आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्य 200 पेक्षा जास्त शाखा आहेत.
Nashik DCC bank3/11

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उलाढाल 5,200 कोटींपेक्षा जास्त आहे. या बँकेच्या राज्यात 210 पेक्षा जास्त शाखा आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रमुख्याने कृषी पतपुरवठ्याला चालना देते. राज्य सरकार यात मोठ्या प्रमाणावर पुनर्भांडवलीकरण करत आहे.
Sangali DCC bank4/11

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांसह शेती उत्पादकांचा मोठा आधार आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक द्राक्ष उत्पादक, शीतगृह आणि पीक कर्ज यांचा पुरवठा करते. या बँकेची उलाढाल 5,500 कोटी आहे. या बँकेच्या 200 हून अधिक शाखा आहेत.
Kolhapur DCC bank5/11

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक ही महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी निवडणूक मानली जाते. दुग्धव्यवसाय आणि शेतकऱ्यांना या बँकेंचा मोठा आधार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उलाढाल 5,800 कोटींपेक्षा जास्त आहे. या बँकेच्या 190 पेक्षा जास्त शाखा आहेत.
ahamadnar DCC bank6/11

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सहकारी साखर कारखाना आणि कृषी पट्ट्यात मोठा दबदबा आहे. या बँकेची उलाढाल 6200 कोटीपेक्षा जास्त आहे. या बँकेच्या 280 पेक्षा जास्त शाखा आहेत.
Thane DCC bank7/11

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उलाढाल 6500 कोटींपेक्षा जास्त आहे. या बँकेच्या 90 शाखा आहेत. ही बँक निम-ग्रामीण ठाणे जिल्हा पट्ट्याला सेवा देते.
sindhudurg DCC bank8/11

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोकणातील झपाट्याने मोठी होत असलेली बँक आहे. या बँकेची उलाढाल 7,176 कोटी आहे. या बँकेच्या 100 पेक्षा जास्त आहेत. शून्य निव्वळ अनुत्पादक मालमत्ता असलेली ही बँक आहे.
Mumbai DCC bank9/11

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (एमडीसीसी) मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठीची प्रमुख वित्तपुरवठा करणारी संस्था आहे. या बँकेंची उलाढाल 15,175 कोटी आहे. या बँकेच्या 50 पेक्षा जास्त शाखा आहेत.
Pune DCC bank10/11

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हा बँक आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामीण बँक म्हणूनही ओळखली जाते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रातील सर्वात जास्त कमाई करणारी जिल्हा बँक देखील आहे. या बँकेची उलाढाल 26,825 कोटी आहे. या बँकेच्या 290 पेक्षा जास्त शाखा आहेत.
satara dcc bank11/11

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त शाखा असलेली जिल्हा बँक आहे. या बँकेच्या राज्यभरात 300 पेक्षा जास्त शाखा आहेत. या बँकेची उलाढाल 6,000 कोटींपेक्षा जास्त आहे. सूक्ष्म वित्त आणि ग्रामीण स्वयंसहायता गट नेटवर्किंगसाठी या बँकेचा उच्च मानांकन प्राप्त झाले आहे.
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Banking News

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पतीनंतर आता कुणाला आणि कधी अटक होणार? पोलीसांनी थेट नावच सांगितले

पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पतीनंतर आता कुणाला आणि कधी अटक होणार? पोलीसांनी थेट नावच सांगितले

2

महाराष्ट्राची गंगा असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या पाण्यात ऑक्सिजन उरलेलाच नाही; पाण्याचे नमुने पाहून संशोधक हादरले!

3

Pension News: पेन्शनधारकांच्या खात्यात दरमहा किती रुपये वाढून येणार? ₹30 हजार पेन्शनधारकांना किती रुपयांचा फायदा?

4

तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने 5 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा कॉल; ऑडिओ तपासणीत मोठा खुलासा

5

टीम इंडियासाठी गुडन्यूज! फिट झाला स्टार गोलंदाज, लवकरच न्यूझीलंडसाठी निघणार

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.