भारताचा माजी कर्णधार आणि सीएसकेचा पोस्टर बॅाय एम एस धोनीने काही दिवसांपूर्वी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पहिल्यांदाच धोनी अनिरुद्ध आणि काव्या मारनच्या रिसेप्शन कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाला.
ग्रीसमध्ये भव्य विवाहसोहळ्यानंतर, काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी चेन्नईमध्ये एका शानदार रिसेप्शनचे आयोजन केले होते.
1/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांचा विवाहसोहळा पार पडल्यानंतर नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी या रिसेप्शनला हजेरी लावली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
अनिरुद्धचे काका, रजनीकांत यांनी स्वागत समारंभात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी पाहुण्यांचे आपुलकीने स्वागत केले. एका फोटोमध्ये रजनीकांत हे अभिनेते अजित कुमार यांना मिठी मारताना दिसले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
भारताचा स्टार क्रिकेट खेळाडू धोनी देखील त्याच्या पत्नीसोबत काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांच्या रिसेप्शनला पाहायला मिळाले या कार्यक्रमातील त्यांचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
अनिरुद्ध आणि काव्याच्या विवाह रिसेप्शनचे सोहळे 22 नोव्हेंबर रोजीही सुरू राहिले. रिसेप्शनच्या दुसऱ्या दिवशी, महेंद्रसिंग धोनी आणि एसआरएचचे प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
प्रसिद्ध अभिनेते अजित कुमार यांनीही या रिसेप्शनला हजेरी लावली होती. धोनी आणि साक्षीची जोडी नेहमीच चाहत्यांची मने जिंकते आणि यावेळीही त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
एम एस धोनी आणि प्रसिद्ध अभिनेते अजित कुमार या दोघांचा फोटो देखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, त्याचबरोबर अनेक क्रिकेट खेळाडू या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
चेन्नई विमानतळावर धोनीचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच्या आगमनामुळे अनेक प्रमुख क्रिकेटपटू या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी अटकळ बांधली जात आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रनच्या रिसेप्शनचे एम एस धोनीचे खास क्षण
धोनी व्यतिरिक्त, भुवनेश्वर कुमार, डेल स्टेन, डॅनियल व्हेटोरी आणि केन विल्यमसन यांसारखे दिग्गज खेळाडूही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया