रणजी ट्रॉफी 2026-27 चे सामने सुरु आहेत, यामध्ये मुंबई विरुद्ध हरियाणा या सामन्यामध्ये मुशीर खानने कमालीची कामगिरी केली. त्याने फक्त फलंदाजीनेच नाही गोलंदाजीने देखील धूमाकुळ घातला.
रणजी ट्रॉफी 2026-27 मध्ये मुशीर खानची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
1/8
Musheer Khan Ranji Trophy Record
आपल्या 21व्या सामन्यात झळकावलेले हे त्याच्या प्रथम-श्रेणी कारकिर्दीतील पहिले शतक होते. आपल्या प्रभावी फलंदाजीच्या कामगिरीनंतर, मुशीरने आपल्या गोलंदाजीनेही कहर केला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
Musheer Khan Ranji Trophy Record
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, या डावखुऱ्या फलंदाजाने 185 चेंडूंमध्ये 109 धावा करत शतक झळकावले. त्याने यात 12 चौकार आणि एका षटकाराचाही समावेश केला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
Musheer Khan Ranji Trophy Record
21 वर्षीय मुशीर खानने हरियानाविरुद्धच्या सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने मुंबईचा विजय जवळपास निश्चित केला होता. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
Musheer Khan Ranji Trophy Record
21 वर्षीय मुशीरने बुधवारी मुंबईत झालेल्या सामन्यात आपली छाप सोडली. मुंबईने पहिल्या डावात 430 धावा केल्या. प्रत्युत्तरात, हरियाणाचा संघ 107.5 षटकांत 270 धावांवर सर्वबाद झाला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
Musheer Khan Ranji Trophy Record
मुंबईसाठी एकाच रणजी ट्रॉफी सामन्यात शतक आणि पाच किंवा अधिक बळी घेणारा मुशीर हा पहिला खेळाडू ठरला आहे . 1990-91 मध्ये रवी शास्त्री यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
Musheer Khan Ranji Trophy Record
भारतीय स्टार यष्टीरक्षक-फलंदाज सरफराज खानचा धाकटा भाऊ असलेल्या मुशीरने, हरियाणाविरुद्ध पहिल्या डावात शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आणि त्यानंतर घातक गोलंदाजी करत 6 बळी घेतले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
Musheer Khan Ranji Trophy Record
मुंबईचा युवा अष्टपैलू खेळाडू मुशीर खानने रणजी ट्रॉफी 2026-27 मध्ये हरियाणाविरुद्धच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून इतिहास रचला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
Musheer Khan Ranji Trophy Record
या अष्टपैलू कामगिरीमुळे मुशीरने एक मोठे यश संपादन केले आहे. एकाच प्रथम-श्रेणी सामन्यात शतक आणि 5 बळी घेणारा तो 21 व्या शतकातील पहिला खेळाडू ठरला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया