भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला, या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार तिलक वर्माला त्याच्या खेळीमुळे सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.
धिम्या गतीने पाकिस्तानविरुद्ध ठोकलेल्या शतकानंतर तिलक वर्मावर सोशल मिडियावर टीका करण्यात येत आहे.
1/7
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मावर टीका
पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या संघाला 48 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्माने शतक झळकावले पण तो भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/7
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मावर टीका
भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी मन तुटणारा सामना होता कारण टीम इंडियाला या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/7
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मावर टीका
तिलक वर्माने शतक झळकावले पण भारताने सामना गमावला, पाकिस्तानविरुद्ध भारत अ संघाने सामना गमावल्यानंतर तिलक वर्माला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/7
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मावर टीका
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये तिलक वर्मा चांगल्या फॅार्ममध्ये पाहायला मिळाला आहे, त्याने दोन सामन्यामध्ये दोन शतके झळकावली आहेत. पण पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या खेळीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/7
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मावर टीका
तिलक वर्माने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात 149 चेंडूमध्ये 100 धावा केल्या यामध्ये त्याने सात चौकार आणि एक षटकार मारला, तिलक वर्माने इंडिया 'अ' संघाच्या डावाला आधार दिला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/7
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मावर टीका
सोशल मिडियावर अनेकजण पाकिस्तानविरुद्ध सामन्यात पराभवाचे कारण तिलक वर्माला ठरवत आहेत, जलद धावसंख्येच्या अभावामुळे तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला असा दावा केला जात आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/7
पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मावर टीका
तिलक वर्माच्या या खेळीमुळे एका नेटकऱ्यांने लिहीले आहे की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिलक वर्मा कसोटी क्रिकेट खेळत आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीले आहे की, गाने खेळा, तुम्ही कसोटी क्रिकेट खेळत नाही आहात का? फोटो सौजन्य - सोशल मिडिया