• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Weekly Numerology : मूलांक 1 आणि 6 साठी देव दिवाळीचा आठवडा ठरणार लकी, मात्र या लोकांनी काळजी घ्यावी, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा 1 ते 9 मूलांकासाठी कसा?

Weekly Numerology : मूलांक 1 आणि 6 साठी देव दिवाळीचा आठवडा ठरणार लकी, मात्र या लोकांनी काळजी घ्यावी, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा 1 ते 9 मूलांकासाठी कसा?

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 23, 2026, 15:08 IST|Updated: Nov 23, 2026, 15:13 IST
joinshare
Saptahik Ank Jyotish 23 to 29 November 2026 in Marathi : हा आठवडा तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या डॉ. कविता ओझा यांच्याकडून

Saptahik Ank Jyotish 23 to 29 November 2026 in Marathi : नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा 1 ते 9 मूलांकासाठी सकारात्मक असणार आहे. कार्तिक पौर्णिमा, गुरु नानक जयंती आणि देव दिवाळीचा हा आठवडा. या आठवड्यात इतरांना समजून घेण्याची, संयम बाळगण्याची आणि एकत्रितपणे काम करण्यांसाठी चांगला असणार आहे. काही लोकांना मोठं यश मिळणार आहे. तर काही लोकांना आर्थिक व्यवहार आणि नात्यामध्ये सावधगिरी बाळगायची आहे.

weekly numerology prediction 23 to 29 November1/9

मूलांक 1 (1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक)

तुमच्यासाठी नोव्हेंबरचा हा शेवटचा आठवडा करिअर आणि आर्थिकदुष्ट्या सकारात्मक ठरणार आहे. पण या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय पूर्वीच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. बँक बॅलेन्स वाढण्याचा अनेक संधी मिळणार आहे. एखाद्या प्रकरणातून तुम्हाला आराम मिळणार आहे. तर व्यवसायात नफा प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर पडणार आहे. तुमच्या कुटुंबाकडून आणि जोडीदाराकडून पाठिंबा मिळणार आहे.
weekly numerology prediction 23 to 29 November2/9

मूलांक 2 (2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लागणार असल्याने मानसिक ताण कमी होणार आहे. करिअरमध्ये आत्मविश्वास आणि दृढनिश्चय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ज्यामुळे तुम्हाला फायदा मिळण्याचे संकेत आहेत. पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. काही किरकोळ आरोग्य समस्या तुम्हाला त्रास देणार आहे. मानसिक शांतीसाठी काही वेळ ध्यान करणे हिताचे ठरणार आहे. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून तुमचा तुमच्या आईसोबत वाद होण्याचे संकेत आहेत.
weekly numerology prediction 23 to 29 November3/9

मूलांक 3 (3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक)

तुम्हाला या आठवड्यात काही चढ-उतारांचा सामना करावा लागणार आहे. अनावश्यक ताण घेऊन नका अन्यथा कामावर ताण येईल. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे हिताचे ठरणार आहे. या आठवड्यात जोखमीचे निर्णय टाळा. एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून आर्थिक लाभाचे संकेत आहेत. यामुळे तुमचं बँक बॅलेन्स मजबूत स्थितीत येणार आहे. कोणतीही प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. कामासोबतच, कुटुंबासाठी वेळ काढा.
weekly numerology prediction 23 to 29 November4/9

मूलांक 4 (4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)

हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. तु्म्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळणार आहे. नवीन करिअरचा मार्ग मोकळा होणार आहे. व्यवसायिकही नवीन करार करणार आहात. व्यावसायिकांना कामासंबंधित प्रवासाचा फायदा मिळणार आहे. त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळणार आहेत. कुटुंबात, तुमच्या आईसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होणार आहे. पण वडिलांशी वादाचे संकेत आहेत. हा आठवडा प्रेम करणाऱ्यांसाठीही अनुकूल राहणार आहे.
weekly numerology prediction 23 to 29 November5/9

मूलांक 5 (5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक)

या लोकांसाठी हा आठवडा आव्हानांनी भरलेला असणार आहे. कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात कोणतेही वाद हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरेल. या काळात आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा एका लहानशा गोष्टीचे गंभीर समस्या होऊ शकतं. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदारासोबत मतभेद संकेत आहे, त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. वाद टाळण्यासाठी एकमेकांच्या भावना समजून घेणे हिताचे ठरणार आहे. शिवाय आरोग्याचीही विशेष काळजी घ्या.
weekly numerology prediction 23 to 29 November6/9

मूलांक 6 (6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)

तुमच्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे. व्यवसाय आणि व्यापारात गुंतलेल्यांसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. तुम्हाला प्रगतीच्या चांगल्या संधी मिळणार आहे. ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळणार आहे. काही लोकांमध्ये उपासना आणि धार्मिक कार्यांमध्ये अधिक रस वाढणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी कामाचे वातावरण सकारात्मक राहणार आहे. नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीचे संकेत आहेत. तुमचा आदर वाढणार आहे. पण आरोग्याकडे लक्ष द्या.
weekly numerology prediction 23 to 29 November7/9

मूलांक 7 (7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक)

हा आठवडा तुमच्यासाठी चांगल्या संधी घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी फायदेशीर गोष्टी घडणार आहे. काही नवीन यशही मिळणार आहे. ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळणार आहे. वैवाहिक जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवरून तणाव जाणवणार आहे. अशात संयम राखणे हिताचे ठरणार आहे. एकत्र बसून तोडगा काढणे फायदेशीर ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला कामाबद्दल अनावश्यक चिंता जाणवणार आहे. अशा परिस्थितीत, स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करा.
weekly numerology prediction 23 to 29 November8/9

मूलांक 8 (8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक)

हा आठवडा व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल असणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीच्या काही चांगल्या संधी मिळणार आहे. यातून तुम्हाला नफा मिळणार आहे. शिवाय, नवीन गुंतवणुकीतून भविष्यात फायदा प्राप्त होणार आहे. पण, कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. गुंतवणूक करताना काळजी घ्या. नोकरीची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. तर आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
weekly numerology prediction 23 to 29 November9/9

मूलांक 9 (9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक)

हा आठवडा या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. या काळात तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी राहणार आहेत. तुमचे सामाजिक संबंध वाढल्याने तुम्हाला फायदा होणार आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. सरकारी कामात अडकले असाल तर त्या समस्यांवर तोडगा सापडणार आहे. नोकरदार लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. प्रभावशाली लोकांशीही संपर्क येणार आहात. तुमची एखाद्या नवीन आणि खास व्यक्तीशी भेटही घेणार आहात. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
TAGS:
Weekly Horoscope
Horoscope

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

2

याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

3

मागच्या 5 वर्षात ₹118170000000 कोटी कमी; BMC च्या फिक्स डिपॉझिटला कशी लागली गळती?; धक्कादायक माहिती!

4

भारताच्या चौथ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचं नाव बदलणार? अचानक का घेण्यात आलाय निर्णय?

5

'...एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं', संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य; तो आमदार कोण? म्हणाला 'मीच त्यावेळी...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.