• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

Rising Asia Cup 2026 : आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये रविवारी भारताचा पाकिस्तान विरुद्ध पराभव झाला. मात्र भारताला या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करून बदला घेण्याची संधी मिळू शकते.

Reported Bypooja pawar
Published: Nov 23, 2026, 18:11 IST|Updated: Nov 23, 2026, 18:49 IST
joinshare
याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला
Image Credit: याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

2

याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

3

मागच्या 5 वर्षात ₹118170000000 कोटी कमी; BMC च्या फिक्स डिपॉझिटला कशी लागली गळती?; धक्कादायक माहिती!

4

भारताच्या चौथ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचं नाव बदलणार? अचानक का घेण्यात आलाय निर्णय?

5

'...एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं', संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य; तो आमदार कोण? म्हणाला 'मीच त्यावेळी...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Rising Asia Cup 2026 : आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये रविवारी झालेल्या ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करून सेमी फायनलचं तिकीट पक्कं केलं आहे. आता भारताचा पुढील सामना हा यूएई विरुद्ध होणार असून हा सामना भारताने जिंकल्यास ते सेमी फायनलसाठी क्वालिफाय होतील. मात्र रविवारी स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेला सामना टीम इंडियाचे खेळाडू तोपर्यंत विसरणार नाहीत जो पर्यंत दोन्ही संघ पुन्हा एकदा स्पर्धेत आमने सामने येत नाहीत आणि भारत पाकिस्तानला पराभूत करत नाही. अंडर 19 आशिया कपमध्ये सुद्धा असच झालं होतं. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं होतं. मग फायनल सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून भारताने खिताब जिंकला. याच महिन्यात आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करण्याची संधी भारताला मिळू शकते.

आशिया कप रॅकिंग स्टार्समध्ये रविवारी भारत - पाकिस्तान संघ आमने सामने आल्याने सुरुवातीपासूनच माहोल गरम होता. त्यात पाकिस्तानने फलंदाजी निवडली. भारताचा गोलंदाज हर्षित राणाचा पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत वाद झाला. शमील हुसैन, इमरान रंधावा आणि मज्ज सदाकत सोबत हर्षित राणा भिडला. जेव्हा हर्षित राणा बाद झाला तेव्हा पाहायला मिळालं की पाकिस्तानचा संघ विजयाच्या दिशेने जात होता आणि ते खूप अग्रेसिव्ह झाले होते. वैभव सूर्यवंशी 11 धावांवर बाद होऊन परतत असताना पाकिस्तानी खेळाडू त्याला टोमणे मारत होते, अशा वेळी तिलक वर्माने मध्ये पडून हस्तक्षेप केला.

हेही वाचा :  ऋषभ पंतचं शतक टीम इंडियासाठी Unlucky? काय आहे हा नकोसा रेकॉर्ड

कधी होणार भारताचा पुढील सामना?

आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये भारताचा पुढील सामना हा यूएई सोबत मंगळवारी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दुपारी 3:30 वाजता हा सामना होणार असून हा सामना जिंकल्यास टीम इंडिया सेमी फायनल पोहोचू शकतो. पहिला सेमी फायनल सामना हा 26 नोव्हेंबर आणि दुसरा सेमी फायनल सामना हा 27  नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर फायनल सामना हा रविवारी 29 नोव्हेंबर रोजी होईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कधी होऊ शकतो?

आशिया कप रायजिंग स्टार्समध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान समोरा समोर येऊ शकतात आणि हे फक्त फायनलमध्ये शक्य आहे.  फॉरमॅटनुसार गट 'अ' मधील अव्वल क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत गट 'ब' मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध खेळेल. जर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जर सेमी फायनलचा सामना जिंकले तर ते फायनल सामन्यात पुन्हा एकदा आमने सामने येतील. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Team india