• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /ऋषभ पंतचं शतक टीम इंडियासाठी Unlucky? काय आहे हा नकोसा रेकॉर्ड

ऋषभ पंतचं शतक टीम इंडियासाठी Unlucky? काय आहे हा नकोसा रेकॉर्ड

Reported Bypooja pawar
Published: Nov 23, 2026, 17:51 IST|Updated: Nov 23, 2026, 17:56 IST
joinshare

Rishabh Pant 7 SENA Centuries Unlucky : भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यात शतक ठोकलं. यासह तो SENA देशांमध्ये शतक ठोकणाऱ्या काही मोजक्या भारतीय फलंदाजांपैकी एक ठरला. मात्र या सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करू शकली नाही आणि सामना ड्रॉ झाला. यासह ऋषभ पंतच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. 

rishabh pant test century 1/6

ऋषभ पंत

टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा SENA या देशांमध्ये फलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन करताना दिसतो. मात्र पंतच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला असून ज्याला पाहून क्रिकेट फॅन्स पुढील वेळी ऋषभ पंतच्या शतकावर जास्त खुश होणार नाहीत.
rishabh pant test century 2/6

7 शतकं लगावली

ऋषभ पंतने SENA देशांमध्ये आतापर्यंत 7 शतकं लगावली आहेत. मात्र तो एकही टेस्ट सामना जिंकण्यात टीम इंडियाला यश आलेलं नाही. ऋषभ पंतने आतापर्यंत SENA देशांमध्ये ज्या सामन्यात शतक लगावले तो सामना टीम इंडिया जिंकू शकली नाही.
rishabh pant test century 3/6

ऋषभ पंतचं शतक :

ऋषभ पंतने ओव्हलमध्ये इंग्लंड विरुद्ध 114 धावा केल्या. ज्यात टीम इंडियाचा पराभव झाला. त्यानंतर सिडनीमध्ये त्याने नाबाद 159 धावा केल्या तो सामना ड्रॉ झाला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत ऋषभ पंतने केपटाउनमध्ये शतक लगावले होते, मात्र त्या सामन्यात सुद्धा टीम इंडिया पराभूत झाली.
rishabh pant test century 4/6

सामना ड्रॉ किंवा पराभूत झाली टीम इंडिया :

ऋषभ पंतने बर्लिंगममध्ये इंग्लंड विरुद्ध 146 धावा केल्या. ज्यात टीम इंडिया पराभूत झाली. लीड्समध्ये त्यांनी दोन इनिंगमध्ये इंग्लंड विरुद्ध शतक लगावले. टीम इंडिया त्या सामन्यात सुद्धा पराभूत झाली. आता वेलिंगटन टेस्टमध्ये त्याने 128 धावा केल्या. तर न्यूझीलंडने सामना ड्रॉ केला.
rishabh pant test century 5/6

टीम इंडिया SENA देशांमध्ये जिंकू शकली नाही

ऋषभ पंतने शतक लावल्यावर टीम इंडिया SENA देशांमध्ये जिंकू शकली नाही. पण यात ऋषभ पंतची चूक नाहीये. मात्र पंत हा सामन्यात कठीण परिस्थितीत टीम इंडियाचा एक भरवशाचा फलंदाज आहे.
rishabh pant test century 6/6

ऋषभ पंत टेस्ट करिअर :

ऋषभ पंतने आतापर्यंत 53 टेस्ट सामने खेळले असून यात त्याने 3853 धावा केल्या आहेत. यात ऋषभने एकूण 9 शतकं आणि 21 अर्धशतक ठोकली आहेत.
TAGS:
Rishabh Pant
Marathi News
Cricket News
Team india

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

धक्कादायक! पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांवर चाकूहल्ला! 5 पोलीस जखमी, फरार झालेल्या आरोपीला गोळ्या घालून...

2

याच महिन्यात पुन्हा होऊ शकतो भारत - पाकिस्तान सामना, टीम इंडिया घेऊ शकते कालच्या पराभवाचा बदला

3

मागच्या 5 वर्षात ₹118170000000 कोटी कमी; BMC च्या फिक्स डिपॉझिटला कशी लागली गळती?; धक्कादायक माहिती!

4

भारताच्या चौथ्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचं नाव बदलणार? अचानक का घेण्यात आलाय निर्णय?

5

'...एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं', संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य; तो आमदार कोण? म्हणाला 'मीच त्यावेळी...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.