आजचे राशीभविष्य 1 नोव्हेंबर 2026 : अहोई अष्टमीसह शुभ रविपुष्य योग! मेष आणि धनु राशीसाठी शुभ, तर या लोकांनी घ्यावी तब्येतीची काळजी
Aajche Rashi Bhavishya 1 November 2026 : नोव्हेंबर महिन्याचा पहिला दिवस अतिशय शुभ आहे. आज रविपुष्य योगासह अहोई अष्टमी आहे. असा हा सुट्टीचा रविवार 12 राशीच्या लोकांसाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 1 November 2026 in Marathi : पंचागानुसार रविवारी आश्विन कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी असून आज अहोई अष्टमी आहे. हे व्रत आई आपल्या मुलांच्या दीर्घयुष्यासाठी ठेवतात. तर आज अत्यंत दुर्लभ आणि शुभ असा रविपुष्य योगासह सर्वसिद्धी योग पण आहे. रविपुष्य योग हा खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. चला मग काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा रविवार जाणून घ्या ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आज महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहे. प्रगतीसाठी नवीन संधी प्राप्त होणार आहे. नकारात्मक विचारापासून दूर रहा.
वृषभ (Taurus Zodiac)
कामाच्या ठिकाणी मेहनतीचं फळ मिळणार आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळणार आहे. जवळच्या व्यक्तीची भेट होण्याचे संकेत आहेत.
मिथुन (Gemini Zodiac)
आजचा दिवस नेहमीपेक्षा खूप चांगला आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबासाठी अनेक गोष्टी करणार आहात. तुम्हाला सकारात्मक वाटणार आहे.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमचा व्यस्त असणार आहे. जुने कामं मार्गी लागणार आहे. अविवाहित व्यक्तीच्या आयुष्यात जोडीदाराची चाहुल लागतंय. मालमत्ता खरेदीचे योग आहेत.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. तुमची कामं पूर्ण करण्यासाठी नवीन मार्ग गवसणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस अतिशय चांगला राहणार आहे. शुभ कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी असेल.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस चढ - उताराचा असणार आहे. कामाची प्रशंसा होणार आहे, पण तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला असून तुमच्या स्वप्नांना, ध्येयाला दिशा मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस उत्तम असणार असून तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. वडीलधाऱ्यांचा सल्ला फायदेशीर ठरणार आहे. बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनिंग करणार आहात. वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा असणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
आज घरात पार्टीचा मूड असणार आहे. आर्थिक स्थिती नेहमीपेक्षा उत्तम असणार आहे. आज इतरांवर आंधळा विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा जास्त चांगला असणार आहे. काही बदल तुम्हाला भविष्यासाठी यश देणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आज आनंदी आनंद दिवस असणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
आज प्रगती पाहिला मिळणार आहे. उत्साह कायम असणार आहे. समाजात तुमचा आदर वाढणार आहे. कुटुंबातील प्रेम वाढणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)