SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजचे राशीभविष्य 16 नोव्हेंबर 2026 : सूर्य गोचर काहींसाठी लाभदायक, तर काहींसाठी घातक, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?

Aajche Rashi Bhavishya 16 November 2026 : सूर्य आज वृश्चिक राशीत गोचर करणार आहे, त्याचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर दिसणार आहे. असा हा सोमवार मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 16, 2026, 06:38 AM IST | Updated: Nov 16, 2026, 06:43 AM IST
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 16 November 2026
Join

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 16 November 2026 in Marathi : सूर्य एक महिन्यानंतर आपली रास बदलतो. पंचांगानुसार सूर्य आज वृश्चिक राशीत असणार आहे. त्यामुळे पुढील एक महिना सूर्य गोचरचा प्रभाव बारा राशीच्या लोकांवर असणार आहे. असा हा आठवड्याचा पहिला दिवस सोमवार मेष ते मीनच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमच्या मनाला शांती मिळणार आहे. विरोधकसुद्धा मैत्रीचा हात पुढे करणार आहे. लोकांमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.


वृषभ (Taurus Zodiac)

आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या आत्मविश्वास वाढणार आहे. एखादे महत्त्वाचे कामं हाती पडणार आहे.  


मिथुन (Gemini Zodiac)
तुमच्यासाठी आठवड्याचा पहिला दिवस सामान्य असणार आहे. भावनिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. व्यवहार करताना काळजी घ्या. एखाद्या समाजकार्यात सहभागी होणार आहात.

 

कर्क (Cancer Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. सावधगिरीने व्यवहार करा. कुटुंबातील सदस्यांशी मतभेदाची चिन्ह आहेत.


सिंह (Leo Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. आर्थिक समस्या दूर होणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. गाडी चालवताना काळजी घ्या.

 

कन्या (Virgo Zodiac)  

आजचा दिवस नेहमीपेक्षा उत्तम असणार आहे. कामात यश मिळणार आहे. छोटा व्यवसातूनही प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असला तरी तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. मात्र आज तुम्ही बोलताना संयम बाळगा. नात्यात चढ - उतार जाणवेल.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

आजचा दिवस चांगला असणार आहे. समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कनिष्ठ तुमच्याकडून मार्गदर्शन घेणार आहेत.


मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस चांगला असणार असून कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणार आहात. प्रगतीच्या नवीन संधी मिळणार आहे. धार्मिक कार्यांमध्ये रस वाटणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

आजचा दिवस उत्तम असणार असून नशीबाची साथ मिळणार आहे. एखादी गोष्ट अचानक मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीत सामील होण्याची संधी मिळणार आहे.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस चांगला जाणार असून आर्थिकदृष्ट्या स्वतःला मजबूत करण्यासाठीच्या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे. वडीलधाऱ्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES