• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

मंत्री उदय सामंतांनी ऑपरेशन टायगरबाबत केलेल्या सूचक विधानावर संजय राऊतांनी उत्तर दिले. आम्ही टायगर आहोत हे त्यांनी मान्य केलं, उड्या मारणारे माकडं नाही असा टोला राऊतांनी लगावला.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 15, 2026, 11:53 PM IST|Updated: Nov 15, 2026, 11:54 PM IST
joinshare
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र राजकारण : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगू लागलीय.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर 3.0 राबवलं जाणार असल्याची चर्चा आहे.. मंत्री उदय सामंत यांनीही या ऑपरेशनला दुजोरा दिलाय.. मात्र यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झालेत. संजय राऊतांनी थेट माकडाची उडी म्हणत डिवचलंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय शिकारीची चर्चा सुरू झाली आहे. या शिकारीचं नाव आहे ऑपरेशन टायगर 3.0. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. मंत्री उदय सामंत यांनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. मात्र नेमका वार कधी होणार? याबाबत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.
 

सामंतांच्या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही पलटवार केला. खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेला थेट लक्ष्य केले. आम्ही टायगर आहोत. त्यांच्यासारखे उड्या मारणारे माकड नाहीत.
अशा शब्दांत राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचल आहे. शिंदेंची शिवसेना पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार?

दरम्यान शिंदेंच्या पक्षाची अवस्था ना घर का ना घाट का झाली अशी टीका केली. स्वाभिमान गुंडाळून त्यांना काम करावं लागत असल्याची टीकाही खासदार राऊतांनी केली. यावर राऊतांमुळेच त्यांच्या पक्षाची अधोगती झाल्याचा पलटवार शिंदेंचे नेते संजय शिरसाट यांनी केला. अनेक जण एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून पक्षप्रवेशाची इच्छाही व्यक्त करत आहेत. मात्र अंतिम निर्णय एकनाथ शिंदेच घेती. असं मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.

शिंदेंची शिवसेना पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार? अनेकजण आमच्या संपर्कात असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.  एकनाथ शिंदे निर्णय घेतील असही शिरसाट म्हणाले.  या राजकीय संघर्षात आदित्य ठाकरे यांनीही सरकारला सुनावले. ऑपरेशन करायचं असेल तर करा... पण महाराष्ट्रात पाणीटंचाई आहे. उद्योगधंदे राज्याबाहेर जात आहेत. अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरेंनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.  एकीकडे ऑपरेशन टायगरची गर्जना. दुसरीकडे ठाकरे गटाची आक्रमक डरकाळी. या राजकीय चर्चांनी वातावरण तापल आहे. पण या ऑपरेशनमध्ये नेमकी कुणाची शिकार होणार? याचं उत्तर सध्या गुलदस्त्यात आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News