16 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : आग्नेय बंगालच्या उपसागरात 13 नोव्हेंबरपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याची तीव्रता वाढून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकताना या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार आहे. 16 नोव्हेंबरला त्याचे 'अक्वान' चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे भारताच्या हवामानात लक्षणीय बदल झाला आहे. 12 राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 145 स्पीडने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मागील 20 दिवसांत बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे तिसरे चक्रीवादळ आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढल्यावरच चक्रीवादळ कोणत्या भागात जमिनीवर प्रवेश करू शकेल याविषयी सांगता येईल, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार 16 ते 17 नोव्हेंबरपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल. हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकणार आहे. परिणामी काही भागांमध्ये ताशी 145 किलोमीटर वेगापर्यंत वारे वाहू शकतात. समुद्रात मोठ्या लाटा उसळू शकतात. किनारट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल आणि किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागाला पावसाचा मोठा तडाखा बसू शकतो. 16 नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही तुरळक पावसाची शक्यता आहे.