• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात ही काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. विहिरीच्या कठड्याचे दगड आणि मातीचा ढिगारा अचानक कोसळला. आणि चार कामगार थेट 50 फूट खोल विहिरीत अडकले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 15, 2026, 11:24 PM IST|Updated: Nov 15, 2026, 11:26 PM IST
joinshare
पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पंढरपूर न्यूज : पंढरपूर तालुक्यातील आंबे गाव इथं विहिरीचा भाग कोसळून घडलेल्या दुर्घटनेत चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विहिरीत दगड आणि मातीच्या ढिकार्‍याखाली अडकलेल्या कामगारांच्या शोधकार्यासाठी NDRF दाखल झाली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयेन हे मागील काही तासांपासून घटनास्थळावर सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. 

15 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान आंबे गावातील निवास शिंदे यांच्या  विहिरीचा वरील दगड आणि मातीचा भाग विहिरीत कोसळला. काम पूर्ण झालेल्या विहिरीचे मोजमाप घेण्यासाठी चार कामगार 50 फूट खोल विहिरीत उतरले होते. त्याच वेळी अचानक विहिरीच्या दगड आणि मातीचा ढिगारा काही क्षणात कामगारांच्या अंगावर कोसळला. काही क्षणात कामगार या खाली अडकले गेले.  तिथेच असणाऱ्या पोकलेन मदतीने विहिरीतील दगड मातीचा ढीग काढण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र या मध्ये काही अडचणी येत होत्या ही बाब प्रशासनाला लक्षात आल्यानंतर तातडीने एनडीआरएफ पथकाला बोलवण्यात आले. 

रात्रीची वेळ असली तरी लाईटचे व्यवस्था करून या ठिकाणी तातडीने विहिरीत पडलेले मोठे दगड आणि मातीचे ढिगारे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथक काम करणार आहे यानंतर गड आणि मातीच्या ढिगार्‍याखाली अडकल्या कामगारांच्या बद्दल झालेली परिस्थिती समोर येणार आहे.

नेमकं काय घडलं?

विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. पाण्याचा शोधही लागला होता. उरलं होतं फक्त शेवटचं मोजमाप.  मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक विहिरीच्या कठड्याचे दगड आणि मातीचा ढिगारा कोसळला आणि क्षणार्धात चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके आणि आबा घोडके अशी या कामगारांची नावे आहेत.  50 फूट खोल विहिरीत चौघही अडकले. 

श्रीनिवास शिंदे यांच्या शेतात गेल्या 15 दिवसांपासून विहिरीचं काम सुरू होतं. पोकलेन आणि मजुरांच्या मदतीने विहीर खोदण्यात आली. 50 फूट खोली आणि 20 फूट व्यासाची विहीर. विहिरीला पाणीही लागलं होतं. आज सकाळी 9 ते साडेनऊच्या सुमारास चार कामगार अंतिम मोजमापासाठी विहिरीत उतरले. मात्र त्याचवेळी वरच्या भागातील दगड आणि मातीचा मोठा ढिगारा कोसळला. चारही कामगार थेट ढिगाऱ्याखाली दबले गेले. काही क्षणांचा अवधी आणि होत्याचं नव्हतं झालं. ज्या विहिरीचं काम पूर्ण झालं होतं. त्याच विहिरीत 4 कामगार मृत्यूच्या दाढेत अडकले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Religion News
Maharashtra News