• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. अ‍ॅलिस हुआंग ज्या कंपनीत कार्यरत होती त्या कंपनीने हा खुलासा केला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 15, 2026, 10:14 PM IST|Updated: Nov 15, 2026, 10:19 PM IST
joinshare
NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा;  2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

NVIDIA : जगातील सर्वात दिग्गज टेक कंपनी एनव्हिडियाचे माजी सीईओ जेन्सन हुआंग सध्या चांगलेच चर्चेत आहेत. चिनी गर्लफ्रेंड अ‍ॅलिस हुआंग यांच्या प्रेम संबधांचा खुलासा केल्यानंतर त्यांना पदावरुन पायउचार व्हावे लागले आहे. अ‍ॅलिस सिंगापूरस्थित क्लाउड कंपनी मेगास्पीड कंपनीत कार्यरत होती. अ‍ॅलिसवर हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यानंतर कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. अ‍ॅलिसबाबत मेगास्पीड कंपनीने मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणाच्या अंतर्गत चौकशी करण्यासाठी बाह्य कायदेशीर सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
 

जेन्सन हुआंग यांच्यासोबतच्या प्रेमसंबंधांच्या आणि चिनी हेरगिरीच्या आरोपांवर अ‍ॅलिस ज्या कंपनीत कार्यरत होती त्या कंपनीने  प्रतिक्रिया दिली आहे. अ‍ॅलिस हुआंग यांचा आता आमच्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. अ‍ॅलिस हुआंग यांनी 30 ऑगस्ट, 2025 रोजी अधिकृतपणे मेगास्पीड कंपनीतून नोकरी सोडले आहे. सध्या कंपनीत  ती कोणत्याही पदावर कार्रयरत नाही. कंपनीने ॲलिस आणि जेन्सन हुआंग यांच्यातील प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.  त्यांच्या व्यवसाय, पुरवठा साखळी आणि जागतिक कामकाजासंदर्भातील आरोपांची अंतर्गत चौकशी करण्यासाठी त्यांनी बाह्य कायदेशीर सल्लागारांची एक टीम नियुक्त केली असल्याचे कंपनीने सांगितले. "माध्यमांमध्ये आमच्या कंपनीवर केले जाणारे आरोप खोटे असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

चीप चीनला पाठवल्याचा दावा

मेगास्पीड कंपनीने खरेदी केलेल्या प्रगत एनव्हिडिया चिप्स चीनमधील ग्राहकांना गुप्तपणे पाठवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याची चौकशी सुरू आहे. तसे असल्यास, हे अमेरिकेच्या निर्यात निर्बंधांचे स्पष्ट उल्लंघन ठरेल. अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना ॲलिस हुआंग ही एक चिनी गुप्तहेर असल्याचा संशय आहे.  एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने त्यांचे माजी बॉस हनीट्रॅपचे बळी ठरले होते का, याची चौकशीही सुरू केली आहे. तथापि, एनव्हिडियाचा दावा आहे की कंपनीची कोणतीही गोपनीय माहिती लीक झालेली नाही.

CEO जेन्सन हुआंग यांचा राजीनामा

दरम्यान,  एनवीडिया कंपनीचे CEO जेन्सन हुआंग यांनी त्यांच्या सर्व पदांचा तात्काळ राजीनामा दिला आहे. एनवीडिया कंपनीकडून ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. जेन्सन हुआंग यांचा राजीनामा मंजूर केल्याचं कंपनीने म्हटल आहे. गेल्या काही दिवसांपासून हुआंग जगभरातील माध्यमात चर्चेत आहेत. जेन्सन यांच्या चिनी गर्लफ्रेंडवर हेरगिरी केल्याचा आरोप झाल्यानंतर कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली होती.

वैयक्तिक आयुष्यातील गंभीर खुलासे आणि चीनसोबतच्या कथित व्यावसायिक संबंधांमुळे हुआंग यांच्या पदाला मोठा धोका निर्माण झाला होता.  कंपनीचे संचालक मंडळ जेन्सन हुआंग यांना पदावरून हटवण्याबाबत विचार करत होती. जेन्सन यांच्यावरील आरोपांची कंपनीकडून स्वतंत्र चौकशी करण्यात येत होती. अखेर जेन्सन यांनी स्वत:हून सर्व पदांचा राजीनामा दिलाय. आता त्यांच्या पदावर कायमस्वरूपी उत्तराधिकारी नियुक्त होईपर्यंत अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहताना क्रेस कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणूनही कार्यरत राहतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News