SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजचे राशीभविष्य 3 नोव्हेंबर 2026 : मेष - मिथुनला भाग्याची साथ, कर्कला आर्थिक लाभ तर कुंभ राशीच्या लोकांना जॉब ऑफर, कसा आहे आजचा मंगळवार?

Aajche Rashi Bhavishya 3 November 2026 : गणेशाचा दिवस मंगळवार 12 राशीच्या लोकांसाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशीभविष्य...

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 03, 2026, 07:01 AM IST | Updated: Nov 03, 2026, 07:04 AM IST
Image Credit: Aajche Rashi Bhavishya 3 November
Join

Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 2 November 2026 in Marathi : अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. सगळीकडे दिवाळी तयारीची लगबग सुरु आहे. बाजारपेठ्यांमध्ये खरेदीसाठी तुडूंब गर्दी उसळली आहे. अशात मंगळवाराचा आजचा गणेशाचा दिवस काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी कसा असणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून  


मेष (Aries Zodiac)

आजचा दिवस उत्तम असणार आहे. जुनी वस्तू परत मिळणार आहे. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळणार आहे. इतरांचे दृष्टिकोन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणे हिताचे ठरणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा असणार आहे. जोडीदारासोबत धार्मिक स्थळाला जाणार आहात. आज अनेक महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणार आहे.


मिथुन (Gemini Zodiac)
आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत जोडीदाराची साथ मिळणार आहे. जवळच्या मित्राची मदत फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कौटुंबिक संबंध अधिक मजबूत होणार आहे.

कर्क (Cancer Zodiac)  

तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. अनोळखी लोकांशी वाद घालू नका. आर्थिक व्यवहार करताना ज्येष्ठ लोकांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. कामावर लक्ष केंद्रित करा.

सिंह (Leo Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. नवीन वाहन खरेदी तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. जोडप्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे.


कन्या (Virgo Zodiac)  

आजच्या दिवशी नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमची मेहनत आणि चांगल्या वागणुकीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. नात्यामध्ये प्रेम वाढणार आहे.

तूळ (Libra Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स मजूबत स्थितीत असणार आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम राहणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल.


वृश्चिक (Scorpio Zodiac)  

आजचा दिवश यश आणि प्रगती घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.

धनु (Sagittarius Zodiac)

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होणार आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय तुम्हाला फायदा मिळणार आहे. जोडीदारासोबत नातं अधिक मजबूत होणार आहे.

मकर (Capricorn Zodiac)  

आजचा दिवस तुमच्यासाठी मजबूत असणार आहे. ऑफिसमधील तुमची सर्जनशीलता आणखी सुधारणार आहे. नशीब पूर्णपणे तुम्हाला साथ देणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

आजचा दिवस अतिशय चांगला असून कामाच्या ठिकाणी मोठं यश मिळण्याचे संकेत आहेत. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. अचानक आर्थिक लाभाची चिन्ह आहेत.

मीन  (Pisces Zodiac)  

आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आर्थिक समस्या दूर होणार आहे. तुम्हाला आज जोडीदाराची साथ मिळणार आहे. भविष्यासाठी गुंतवणूक करणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES