Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 5 November 2026 in Marathi : आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस. त्यासोबत आज रमा एकादशीदेखील आहे. आजपासून दिवाळीच्या सणांना सुरूवात झाली आहे. आज गुरुवारी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार मालव्य आणि बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. असा हा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस काम, करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनासाठी कसा असणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन आजचे राशीभविष्य ज्योतिषशास्ज्ञ तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून
मेष (Aries Zodiac)
आज बहुतेक कामं पूर्ण होणार आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती भक्कम राहणार आहे. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या. आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आज तुमची अडकलेली कामं सहजपणे मार्गी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा मान - सन्मान वाढणार आहे. घरात आनंदाचे वातावरण असणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
आज तुमच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक असणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. नवीन योजना आखणार आहात.
कर्क (Cancer Zodiac)
आज कुटुंबासोबत आनंदाने दिवस जाणार आहे. विद्यार्थी आज थोडं यश प्राप्त होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नोकरीच्या चांगल्या संधी मिळणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
आजचा दिवस तुमच्या अपेक्षांपेक्षा चांगला असणार आहे. पैशांची चिंता मिटणार आहे. जोडीदारासोबतचा संवाद प्रेम जीवनात आनंद आणणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
आज नशीब तुम्हाला साथ देणार आहे. चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या गोष्टीबद्दल उत्सुकता राहणार आहे. आत्मविश्वास टिकणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चढ - उताराने भरलेला असणार आहे. एखादी समस्या सोडवण्यासाठी मदतीची गरज लागणार आहे. कामावर अधिक मेहनत करावी लागणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजनेवर काम करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रांकडून पाठिंबा मिळेल. कार्यालयात उत्साहवर्धक परिस्थिती असणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुम्हाला मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक बदल होणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
आज जोडीदारांच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करा. आज तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. वादविवाद टाळा. तुमचा खर्च वाढणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आज तुम्हाला एकापाठोपाठ चांगल्या बातम्या मिळणार आहे. नवीन स्त्रोतांकडून अचानक पैसे मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या मानसिक समस्यांवर उपाय सापडणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
कुटुंब आणि मित्रांपरिवारांसोबत आज आनंदात दिवस जाणार आहे. जोडीदाराच्या सहकार्याने महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमची एखाद्या सहकाऱ्याशी मैत्री होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)