दिवाळी पाडव्याला चंद्राचे वृश्चिक राशीत प्रवेश! मिथुनसह 3 राशींसाठी धोकादायक, आर्थिक नुकसानसह प्रवासात घ्या काळजी
9 नोव्हेंबरच्या रात्री उशिरा चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केलाय. या चंद्र संक्रमणादरम्यान काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
हिंदू धर्मानुसार पंचांग हे नऊ ग्रहांवर आधारीत आहे. हे नऊ ग्रह आपली स्थिती एका विशिष्ट्य वेळी ठराविक अंतराने आपली स्थिती बदलत असतात. शनि ग्रह हा सर्वात संथ गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. तर चंद्र हा सर्वात वेगवान गतीने आपली स्थिती बदलतो. तो एका राशीत दीड दिवस राहतो. चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला. चंद्र गोचरमुळे तीन राशीच्या लोकांसाठी तो त्रासदायक ठरणार आहे. या लोकांना आर्थिक नुकसानसोबत कौटुंबिक जीवनात आव्हाने सहन करावे लागणार आहे.
मेष रास
तुमच्यासाठी चंद्र गोचर चिंताजनक ठरणार आहे. गाडी चालवताना काळजी घ्या. शिवाय मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. आर्थिक स्थिती अडचणीत सापडणार आहे. कामाच्या ठिकाणी चढ उतार पाहिला मिळणार आहे. याकाळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे नुकसानदायक ठरेल. यादिवसांमध्ये हनुमान चालिसाचे पठण करा.
मिथुन रास
चंद्र गोचरमुळे या राशीच्या लोकांना आरोग्याची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे चंद्र गोचर काळात बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळा. त्यासोबत शत्रूंपासून सावध रहा. आपली महत्त्वाची माहिती इतरांना देऊ नका. वाईट संंगतीपासून दूर रहा. वेळ आणि पैसा दोन्ही वाया जाण्याची भीती आहे. कायदेशीर नियमांचं उल्लंघन करु नका.
धनु रास
अचानक अनावश्यक खर्च वाढणार आहे. काही लोकांना मनाविरुद्ध काही खर्च करावे लागणार आहे. या काळात तुम्ही कुठलीही गुंतवणूक करु नका. वैवाहिक जीवनातही सावधगिरीने वागणे हिताचे ठरणार आहे. जोडीदारावर संशय घेणे तुम्हाला महागात पडू शकतं. नात्यावर परिणाम होऊ शकतो. समाजात वावरताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुम्हाचे नुकसान होईल.
चंद्र तुमच्या राशीपासून बाराव्या घरात भ्रमण करेल, जे नुकसानीचे घर मानले जाते. या भ्रमणामुळे तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो. काही लोकांना अनिच्छेने पैसे खर्च करावे लागतील. या काळात
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)