आज 'देव दिवाळी'! दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, 5 दिव्यांचा नियम जाणून घ्या
कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. यादिवशी घरात किती दिवे लावावे आणि दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त काय जाणून संपूर्ण माहिती एका क्लिकवर
दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमाला देव दिवाळी साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात देव दिवाळीला अतिशय महत्त्व आहे. यादिवशी मंदिर, नदी काठ, घाट याठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. असं म्हणतात या दिवशी स्वर्गातील देव पृथ्वीतलावर येतात, म्हणूनच याला देव दिवाळी असं म्हटलं जातं. यादिवशी दीपदान करण्याची प्रथा आहे.
कार्तिक पौर्णिमा तिथी
कार्तिक पौर्णिमा तिथी ही 23 नोव्हेंबर 2026 सोमवारी रात्री 11:42 वाजता सुरु झाली असून पौर्णिमा तिथी 24 नोव्हेंबर 2026, रात्री 8:23 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026 म्हणजे आज देव दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.
देव दिवाळीचा शुभ मुहूर्त
हिंदू धर्मात प्रदोष काळ आणि गोरज मुहूर्त याला अतिशय महत्त्व आहे. सूर्यास्तच्या जवळपासचा हा अतिशय शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे प्रदोष काळ आणि गोरज मुहूर्त दिवे लावणे शुभ मानले जाते. असं म्हणतात की देव दिवाळीच्या दिवशी दीपदान केल्यास पुण्यप्राप्त होतं. जीवनातील अंधकार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर देव दिवाळीला प्रदोष काळ संध्याकाळी 5:56 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत असणार आहे. तर दिवे लावण्याचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5:56 ते रात्री 8:30 दरम्यान असणार आहे.
देव दिवाळीची पौराणिक कथा काय?
देव दिवाळीच्या दिवशी महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला होता आणि देवतांना त्यांच्या त्रासातून मुक्त केलं होतं. म्हणून हा दिवस देव विजय म्हणून स्वर्गात दीपोत्सव साजरा करतात.
देव दिवाळीत दिवे लावणे शुभ
कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळीला घरात किमान पाच दिवे लावले पाहिजे.
दोन दिवे हा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावावा. हे दिवे मोहरीच्या तेलाचे असावे. असं म्हणतात यामुळे घरावरील वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होतं.
त्यानंतर एक दिवा तुळशी वृंदावन आणि एक दिवा घरातील देवघरात लावावा. यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
पाचवा दिवा हा घरातील पाणी साठवले असतात तिथे लावणे शुभ मानले जाते. तसंच तुम्ही एक दिवा तुमच्या परिसरातील पिंपळाच्या झाडाजवळही लावू शकता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)