SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

20 की 21 नोव्हेंबर, देवउठनी एकादशी कधी? तर या दिवशीपासून सुरु होणार तुळशी विवाह

पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी येत आहे. ज्यामुळे देवउठानी एकादशीच्या तारखेबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 19, 2026, 21:59 IST | Updated: Nov 19, 2026, 22:03 IST
Image Credit: devuthani ekadashi 2026
Join

हिंदू पंचांगानुसार, देवउठनी एकादशीचा उपवास कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला केला जातो. एकादशींमध्ये ही एकादशी विशेष आहे, कारण याच दिवशी भगवान विष्णू आपल्या चार महिन्यांच्या योगिक निद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा शेवट होतो. या एकादशीला  प्रबोधिनी एकादशी, देवोत्थान एकादशी, हरी प्रबोधिनी एकादशी आणि भागवत एकादशी या नावानेही ओळखली जाते. यंदा एकादशीचा उपवास कधी करायचा याबद्दल संभ्रम आहे.

द्रिक पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:15 वाजेपासून 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:31 वाजेपर्यंत असणार आहे.

ज्येष्ठ पंचागकर्ते दा.कृ.सोमण यांनी याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले की, या वर्षी कार्तिक प्रबोधिनी एकादशीचा उपवास कधी करायचा हा प्रश्न विचारला जातोय. यावर्षी कार्तिक शुक्ल एकादशी क्षय तिथी आहे. म्हणजे ही तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नाही. त्यामुळे नियमाप्रमाणे शैव म्हणजे शंकराच्या उपासकांनी स्मार्त प्रबोधिनी एकादशीला शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी उपवास करावयाचा आहे. तर वैष्णव म्हणजे विष्णू भक्तांनी म्हणजेच वारकरी उपासकांनी शनिवारी 21 नोव्हेंबर रोजी उपवास करावयाचा आहे. त्याच दिवशी पंढरपूर यात्रा आहे. तर तुळशी विवाह शनिवार 21 नोव्हेंबर पासून मंगळवार 24 नोव्हेंबर पर्यंत करावयाचे आहेत.

देवउठानी एकादशी व्रताला या मंत्राचा जप करा
ओम अं वासुदेवाय नम:
ॐ
अंकर्षनाय नम: ॐ अं प्रद्युम्नाय नम:
ॐ अनिरुद्धाय नम:
ॐ नरायनाय नम:
ॐ नमो भागवाते वासुदेवाय
ॐ ओम विष्णवे नम:
ॐ विष्णवे नम:


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES