दिवाळीनंतर गुरु - मंगळमुळे 3 राशीच्या लोकांची चांदीच चांदी, करिअरसोबत आर्थिक लाभाचे संकेत
दिवाळीनंतर 12 नोव्हेंबर 2026 ला सिंह राशीत गुरु आणि मंगळाची युती होणार आहे. ही युती तीन राशीच्या लोकांसाठी करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक बाबीत फायदेशीर ठरणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर गुरु - मंगळची युती तीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या लोकांसाठी प्रगती आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. ही युती 12 नोव्हेंबरला गुरु - मंगळची युती होणार आहे. ही युती मेष, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय असो वैयक्तिक आयुष्यात सुवर्ण संधी घेऊन आला आहे. या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा ज्ञान, भाग्य, संपत्ती, शिक्षण आणि समृद्धीचा ग्रह तर मंगळ ग्रह धैर्य, ऊर्जा, शौर्य, आत्मविश्वास आणि भूमीचा कारक मानला जातो. गुरु - मंगळची युतीचा परिणार 12 राशीच्या लोकांवर होणार आहे. पण तीन राशींसाठी तो अतिशय भाग्यशाली ठरणार आहे.
मेष रास
या राशीच्या लोकांना करिअरमध्ये सकारात्मक बदल पाहिला मिळणार आहे. करिअरमध्ये महत्त्वाची जबाबदारी तुम्हाला मिळण्याचे चिन्ह आहेत. नोकरी करणाऱ्या लोकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे. व्यवसायिकांसाठीही चांगली संधी चालून येणार आहे. तर वैयक्तिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे.
सिंह रास
गुरु - मंगळची युती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी तुमची एक महत्त्वाची आणि सकारात्मक बदल दिसून येणार आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे. नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा महत्त्वाचा करार तुमच्या आयुष्यात एक सकारात्मकदृष्टीकोनात बदल घडवणारा असणार आहे.
कुंभ रास
गुरू आणि मंगळाच्या युतीमुळे तुम्हाला आयुष्यात नवंनवीन संधी मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती अनेक मार्ग खुले होणार असून आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळणार आहे. तुमच्या मेहनत आणि अनुभव कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा उजाळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)