आर्यवीर सेहवागची IPL 2027 मध्ये दमदार एन्ट्री, बेस प्राइज किती पाहिलत का?
आर्यवीर सेहवागने अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये धूमाकुळ घातला होता, आता तो आयपीएलमध्ये धूमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतीय अंडर 19 संघाने नुकत्याच झालेल्या आशिया कप 2026 चे जेतेपद नावावर केले. अंडर 19 आशिया कप 2026 च्या फायनलच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला पराभूत करुन विजेतेपद नावावर केले. पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये मॅचविनर ठरलेला मोहित उल्वाने आता क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मोठे पाऊल ठेवणार आहे. तर भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू वीरेंद्र सेहवाग यांचा मुलगा आर्यवीर सेहवागने अंडर 19 आशिया कप 2026 मध्ये धूमाकुळ घातला होता, त्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तो त्याच्या कामगिरीने या स्पर्धेमध्ये सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला.
आयपीएल 2027 चा लिलावाची तारिख जवळ येत आहे अनेक अपडेट्स या लिलावाच्या संदर्भात पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी आयपीएल 2027 ची रिटेन आणि रिलीज यादी संघांनी जाहीर केली होती. आता 16 नोव्हेंबरला होणाऱ्या आगामी लिलावासाठी अनेक भारतीय आणि विदेशी खेळाडूंनी लिलावाची नोंदणी केली आहे. आशिया कपमध्ये आपली छाप सोडणारा आर्यवीर सेहवाग आणि त्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बाजी पलटवणारा अष्टपैलू खेळाडू मोहित उल्वा यांनी आयपीएल 2027 च्या मिनी-लिलावासाठी नोंदणी केली आहे. मात्र, कर्णधार लक्ष्य रायचंदानीसह अनेक खेळाडूंनी मिनी-लिलावासाठी आपली नावे सादर केलेली नाहीत.
हे ही वाचा
मैदानावर अभिषेक शर्माला डिवचणाऱ्या गोलंदाजाने मागितली माफी! म्हणाला - 'तुम्ही नाराज...' Video viral
आर्यवीर सेहवागची आशिया कपमधील कामगिरी
ओमानमध्ये नुकत्याच झालेल्या आशिया कप 2026 च्या स्पर्धेमधील आर्यवीर सेहवागच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर तो या स्पर्धेमध्ये 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' होता, तर अंतिम सामन्यात मोहित उल्वा 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता. त्याने अंडर-19 आशिया कपमध्ये पाच सामन्यांच्या पाच डावांमध्ये एकूण ३६१ धावा केल्या. त्या स्पर्धेत त्याची सरासरी 90.25 होती. ही एक एकदिवसीय स्पर्धा होती, ज्यामध्ये आर्यवीरने 95.50 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि एकूण 38 चौकार व 16 षटकार मारले. त्याने एका सामन्यात शतक आणि तीन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. त्याच्या फलंदाजीत एक अनोखे सातत्य दिसून आले. यामुळेच काही आयपीएल संघ त्याच्यावर लक्ष ठेवून असू शकतात.
मोहित उल्वाची कामगिरी
मोहित उल्वाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, पण पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने 26 चेंडूंमध्ये 49 धावांची नाबाद खेळी केली. त्याने शेवटच्या काही फलंदाजांसोबत भागीदारी केली आणि जेव्हा शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती, तेव्हा त्याने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यानंतर त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही संधी मिळाली आणि आता तो आयपीएल लिलावातही असू शकतो, कारण अंतिम यादी अद्याप जाहीर व्हायची आहे.