IND vs PAK दोन वेळा भिडणार, ACC केले वेळापत्रक जाहीर! 'या' दिवशी होणार सामने
भारत पाकिस्तान सामना पाहायला चाहत्यांचा उत्साह नेहमीच शिगेला असतो, आता आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना असतो तेव्हा क्रिकेट चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचतो. आता क्रिकेट चाहत्यांचा उत्साह हा पुढील महिन्यामध्ये दुप्पट वाढणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना पाहायला मिळणार आहे. भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने नोव्हेंबर महिन्यांमध्ये एकदा नाही तर दोनदा एकमेकांसमोर येणार आहेत. नुकतेच पहिले 19 वर्षांखालील (अंडर-19) स्तरावर आणि नंतर 'अ' संघ स्तरावर या दोन देशांमध्ये तीव्र स्पर्धा पाहायला मिळेल, यासंदर्भात सविस्तर वाचा.
क्रिकेट चाहत्यांसाठी नोव्हेंबर महिन्यांमध्ये मनोरंजनाची मेजवानी असणार आहे त्याचे कारण म्हणजेच नोव्हेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार आहे, कारण अंडर 19 आशिया कप 2026 च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये दोन्ही देशांमधील युवा खेळाडू हे आपले कौशल्य दाखवताना दिसतील. तर ही स्पर्धा झाल्यानंतर आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 या स्पर्धेला सुरुवात 19 नोव्हेंबरपासून होणार आहे या स्पर्धेचे आयोजन हे दोहा आणि कतार येथे या सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे.
हे ही वाचा
'आमच्या संघातील प्रत्येकजण मॅचविनर...' श्रेयस अय्यरने उघड केले विजयाचे रहस्य!
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 मध्ये या स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत, या आठ संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) हे संघ खेळताना दिसतील तर, गट 'ब' मध्ये श्रीलंका अ, बांग्लादेश अ, अफगाणिस्तान अ आणि हाँगकाँग चीन हे संघ एकमेंकांच्या विरोधात खेळतील. नियमांनुसार, दोन्ही गटामध्ये जे दोन संघ अव्वल स्थानावर असतील ते संघ सेमीफायनलमध्ये खेळताना दिसतील. एसीसी इमर्जिंग टीम्स एशिया कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या टी२० स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिलेली नाही.
एसीसी इमर्जिंग टीम्स एशिया कपमध्ये भारताचे संपूर्ण वेळापत्रक
20 नोव्हेंबर - भारत विरुद्ध नेपाळ - 1.00 PM
22 नोव्हेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान - 1.00 PM
24 नोव्हेंबर - भारत विरुद्ध यूएई - 1.00 PM