W, W, W, W... न्यूझीलंडमध्ये अर्शदीप सिंगची खळबळ! गर्लफ्रेंडसाठी केले खास सेलिब्रेशन
भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतीय संघाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने 4 विकेट्स घेतले यामध्ये त्याने एक खास सेलिब्रेशन केले, याबद्दल त्याने खुलासा केला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे, या मालिकेचा पहिला सामना ईडन पार्क येथे खेळवला जात आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने कमालीची कामगिरी पहिल्या डावामध्ये केली. टी20 मालिकेमध्ये सातत्याने टीम इंडियाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज पूर्णपणे फेल झाले. या सामन्यामध्ये भारताचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंगने भारतीय संघाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये त्याने 4 विकेट्स घेतले यामध्ये त्याने एक खास सेलिब्रेशन केले, याबद्दल त्याने खुलासा केला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये अर्शदीप सिंगने 10 ओव्हरमध्ये चार विकेट्स घेतले, त्याची या काळामध्ये सरासरी 7 ची राहिली. अर्शदीपने या सामन्यामध्ये टीम इंडियाला काही महत्त्वाचे विकेट्स घेऊन दिले. त्याने हेन्री निकोल्सलाही बाद केले. इतकेच नाही, तर त्याने फॉर्मात असलेल्या ग्लेन फिलिप्सलाही बाद केले. याव्यतिरिक्त, अर्शदीप सिंगने काईल जेमिसनला बाद करून टीम इंडियाला न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच बाद करण्यास मदत केली. भारताच्या गोलंदाजांची दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंडच्या संघाला 185 धावांवर गुंडाळले.
अर्शदीप सिंगचे सेलिब्रेशन
जेमिसनचा विकेट घेतल्यानंतर अर्शदीप सिंगने एक खास सेलिब्रेशन केले आणि त्यानंतर त्याने या सेलिब्रेशन का केले यासंदर्भात रहस्य उघड केले आहे. पहिल्या इनिंगनंतर, अर्शदीपने गुपित उघड केले आणि सांगितले की हा डान्स त्याची गर्लफ्रेंड, अभिनेत्री-मॉडेल समरीन कौरसाठी होता. "हा आनंदोत्सव माझ्या गर्लफ्रेंडसाठी होता," अर्शदीप हसत म्हणाला. "जेव्हा कधी आम्ही एकत्र असतो किंवा आम्हाला थोडे उदास वाटत असते, तेव्हा एकमेकांचा मूड चांगला करण्यासाठी आम्ही याच डान्स स्टेप्स करतो." असे खेळाडूने सांगितले.
आपल्या आवडत्या विकेटबद्दल विचारले असता, पुढे गोलंदाज अर्शदीप सिंग म्हणाला की, "माझी आवडती विकेट पाचवी असती, जी मला मिळाली नाही. त्यामुळे मी अजूनही पाचव्या विकेट्च्या शोधात आहे. शेवटी, मी म्हणेन की आम्ही थोडे जास्तच हपापलो होतो आणि फक्त विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात होतो. आम्ही संपूर्ण डावात जे करत होतो तेच पुढे चालू ठेवायला हवं होतं, म्हणजे आम्हाला विकेट्स मिळाल्या असत्या. पण शेवटी, आम्ही थोडे जास्तच हपापलो. मला वाटलं की खेळपट्टीमध्ये काहीतरी विशेष आहे, त्यामुळे आम्ही फक्त सीमवर फटके मारून जोरदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला."