काही तासात भारत पाकिस्तान भिडणार! जाणून घ्या वेळ आणि लाईव्ह स्ट्रिमिंगची संपूर्ण माहिती
टी20 आंतरराष्ट्रीय संघामधील अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मासारखे दमदार खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. आता भारत पाकिस्तान सामना कधी आणि कुठे भारतीय वेळेनुसार सुरु होणार आणि सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 306 धावांनी विजय मिळवला. आता भारताच्या संघासमोर पुढील आव्हान हे पाकिस्तानच्या संघाचे असणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये कमालीची कामगिरी केली, तर गोलंदाजांनी सामन्यामध्ये धूमाकुळ घातला. बीसीसीआयने या स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा मजबूत संघ या स्पर्धेमध्ये पाठवला आहे, टी20 आंतरराष्ट्रीय संघामधील अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मासारखे दमदार खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. आता भारत पाकिस्तान सामना कधी आणि कुठे भारतीय वेळेनुसार सुरु होणार आणि सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
भारत पाकिस्तान अवघ्या एका आठवड्यात हे दोन संघ पुन्हा एकदा आमनेसामने येतील. तुम्ही हा सामना तुमच्या टीव्ही आणि मोबाईलवर थेट कसा पाहू शकता, हे जाणून घ्या. हा सामना 22 नोव्हेंबर रोजी दोहा येथे होणार आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये विजय मिळवला तर सेमीफायनलमध्ये टीम इंडिया थेट प्रवेश करेल.
एशिया कप रायझिंग स्टार्स या स्पर्धेचे मीडिया हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला टीव्हीवर सामना थेट पाहायचा असेल, तर तुम्ही तो सोनी स्पोर्ट्सवर पाहू शकता. तुमच्या मोबाईलवर सामना पाहण्यासाठी, तुम्हाला सोनी लिव्ह ॲपवर जावे लागेल. सोनी लिव्ह ॲपद्वारे टॅब्लेट आणि लॅपटॉपवरही सामना थेट पाहता येईल. सामन्याचे ठिकाण दोहा आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल आणि त्याच्या अर्धा तास आधी, दुपारी 3 वाजता, दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
हे ही वाचा
शुभमन गिल OUT की NOT Out? कर्णधाराचा विकेट वादात, न्यूझीलंडचे खेळाडू पंचाशी भिडले
भारतीय संघाच्या प्लेइंग 11 बद्दल सांगायचे झाले तर पहिल्या सामन्यामध्ये प्रभसिमरण सिंगला बेंचवर बसवण्यात आले होते, त्याच्या जागेवर कुमार कुशाग्रला संघात स्थान मिळाले होते. कुमार कुशाग्रने संघासाठी नेपाळविरुद्ध सामन्यामध्ये शतक झळकावले. त्याचबरोबर भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्माने देखील शतक ठोकले होते. पण पहिल्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी आणि अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग हे पूर्णपणे फेल झाले.
भारत अ संपूर्ण संघ
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह, तिलक वर्मा (कर्णधार), आयुष बडोनी, रिंकू सिंह (उपकर्णधार), कुमार कुशाग्र (विकेट कीपर), शाहबाज अहमद, सूर्यांश शेडगे, विप्रज निगम, हर्षित राणा, अरशद खान, प्रिंस यादव, तनुश कोटियन, हर्ष दुबे