SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ग्लेन मॅक्सवेलने जाहीर केली निवृत्ती, अचानक सर्व फॉरमॅट्समधून जाहीर केला सन्यास

Glenn Maxwell Retirement : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक ऑलराऊंडर असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. सोमवारी त्याने याबाबत घोषणा केली.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 03, 2026, 12:56 AM IST | Updated: Nov 03, 2026, 01:44 AM IST
Image Credit: ग्लेन मॅक्सवेलने जाहीर केली निवृत्ती, अचानक सर्व फॉरमॅट्समधून जाहीर केला सन्यास
Join

Glenn Maxwell Retirement : ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज आणि जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत नाव मिळवलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वनडे फॉरमॅटमधून तो आधीच निवृत्त झालेला त्यानंतर मॅक्सवेल आता टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्त झाला आहे. मॅक्सवेल जगभरातील विविध टी20 लीगमध्ये आपली आक्रमक शैली दाखवणे सुरूच ठेवणार असला, तरी त्याला पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाची पिवळी जर्सी परिधान केलेली पाहायला मिळणार नाही.

मॅक्सवेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अशा रोमांचक घडामोडीने भरलेली आहे, ज्यांनी क्रिकेटच्या इतिहासात एक विशेष स्थान मिळवून दिले आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कप दरम्यान वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने खेळलेली 201 धावांची नाबाद खेळी, वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. गंभीर क्रॅम्प्स येत असूनही त्याने केवळ लेग साइड शॉट्सचा वापर करून सिक्स मारले आणि 91 धावांत 7 विकेट गमावलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला ऐतिहासिक विजयापर्यंत पोहोचवले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दुहेरी शतक झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.

मॅक्सवेलची कारकीर्द : 

मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी 149 वनडे सामने खेळले असून त्यात 126.70 च्या प्रभावी स्ट्राईक रेटसह एकूण 3895 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 4 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली. ज्यामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेली नाबाद 201 धावांची ऐतिहासिक खेळी ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. याशिवाय आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जोरावर वनडे सामन्यांमध्ये 77 विकेट्स सुद्धा मिळवले. त्याने 110 हून अधिक टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 2600 हून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याने 5 शानदार शतकं आणि 11  अर्धशतकं झळकावली. गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचे तर, त्याने टी20 क्रिकेटमध्ये 44 विकेट्सही मिळवले आहेत.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES