SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बीसीसीआयने केली इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा!

भारत अंडर 19 महिला विरुद्ध इंग्लंड अंडर 19 महिला संघामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका भारतामध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये पाचही सामन्याची संपूर्ण वेळापत्रक सविस्तर वाचा आणि कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 21, 2026, 21:58 IST | Updated: Nov 21, 2026, 22:05 IST
Join

भारताचा पुरुष संघ एकिकडे न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे तर एकिकडे भारत अ पुरुष संघ आशिया कप खेळत आहे. तर काही दिवसांपूर्वी भारताच्या अंडर 19 संघाने पाकिस्तानला फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत आशिया कपमध्ये स्थान पक्के केले. आता बीसीसीआयने आणखी एका संघाची घोषणा केली आहे, बीसीसीआयने अंडर 19 महिला संघाची घोषणा केली आहे. भारत अंडर 19 महिला विरुद्ध इंग्लंड अंडर 19 महिला संघामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका भारतामध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये पाचही सामन्याची संपूर्ण वेळापत्रक सविस्तर वाचा आणि कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले यासंदर्भात सविस्तर वाचा.

बीसीसीआयच्या महिला निवड समितीने शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. 18 वर्षीय भाविका अहिरे हिची संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. ती यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळेल. श्रेया एस. चव्हाणचा संघात दुसरी यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. इरा जाधव, निधी महातो, पूर्वा सिवाच, मेहक नरवासे आणि मैत्री मनियार यांसारख्या युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय 19 वर्षांखालील महिला संघ

भाविका अहिरे (कर्णधार आणि विकेटकिपर), इरा जाधव, निधी महतो, पूर्वा सिवाच, मेहक नरवसे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस चव्हाण (विकेटकीपर), समायरा राघव, कुमारी पलक, उमा काश्वी, अचसा परमार, अनादी टागड़े (उपकर्णधार) और पलक सिंह.

संपूर्ण वेळापत्रक

पहिला टी२० - आंतरराष्ट्रीय - २६ नोव्हेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - वडोदरा - संध्याकाळी ६ वाजता
दुसरा टी२०    - २८ नोव्हेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - वडोदरा - दुपारी १ वाजता
तिसरा टी२० - आंतरराष्ट्रीय - १ डिसेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - सूरत - संध्याकाळी ६ वाजता
चौथा टी२० - ३ डिसेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - सूरत - संध्याकाळी ६ वाजता
पाचवे टी२० - ६ डिसेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - सूरत - दुपारी १ वाजता

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES