IPL 2027 : बीसीसीआयने आयपीएल फ्रेंचायझींना त्यांची प्लेअर रिटेंशन लिस्ट जाहीर करण्यासाठी दिलेल्या मुदतीत वाढ केली आहे. बीसीसीआयने संघांना ईमेल पाठवून फ्रेंचायझींना सांगितलं आहे की आता ते 17 नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंची फायनल लिस्ट जाहीर करू शकतात. सुरुवातीला प्लेअर रिटेंशनची मुदत ही 15 नोव्हेंबर होती. बीसीसीआयने आयपीएल मिनी ऑक्शनच्या तारखेत किंवा ठिकाणात कोणताही बदल केलेला नाही. हा कार्यक्रम 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणार आहे.
अचानक का बदलण्यात आली तारीख?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे सामन्यामुळे आयपीएल खेळाडूंच्या रिटेंशन लिस्ट सादर करण्याची अंतिम मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान वनडे सीरिजमध्ये पाचवा आणि शेवटचा सामना 15 नोव्हेंबर रोजी माउंट मौनगानुई येथील बे ओव्हलवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने सर्व संघांना त्यांची रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन अतिरिक्त दिवस दिले आहेत. योगायोगाने ज्या दिवशी 16 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. त्याच दिवशी बेंगळुरूमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात एक वनडे सामनाही नियोजित आहे. आतापर्यंत बीसीसीआयने या सामन्याचे वेळापत्रक बदलण्याचा विचार केलेला नाही.
20 वा सीजन ठरणार खास :
आयपीएल 2027 हा इंडियन प्रीमियर लीगचा 20 वा सीजन असणार असून या करता गोव्यात डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन पार पडेल. यंदाच्या सीजनमध्ये अनेक स्टार खेळाडू ट्रेड किंवा त्यांच्या पारंपरिक संघातून रिलीज होण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या नावाबाबत सुद्धा चर्चा सुरु आहे. हार्दिक पांड्या साठी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये ट्रेड होणार असून हार्दिक ऐवजी केकेआर मधील हर्षित राणा आणि अंगकृश रघुवंशी यांना मुंबई इंडियन्स संघात घेऊ इच्छिते अशी माहिती आहे.
पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत. पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.