पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या सामन्यामध्ये भारताने जपानला पराभूत करुन भारतीय हॅाकी संघ चॅम्पियन झाला आहे. गुरुवारी मोहाली येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने जपानला 4-1 ने पराभूत करून सहाव्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेची ट्रॉफी जिंकली. तथापि, भारतीय संघासाठी सामन्याची सुरुवात चांगली झाली नाही आणि जपानने तिसऱ्या मिनिटाला गोल करून 1-0 अशी आघाडी घेतली. पण यानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत सामन्यावर नियंत्रण मिळवले. या सामन्यामध्ये भारतीय हॅाकी संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
भारताने तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये जोरदार कामगिरी करत झटपट गोल केले. भारताने सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय संघाने 2011, 2016, 2018, 2023, 2024, 2026 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. जपानविरुद्ध भारताकडून शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंग, जुगराज सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांनी गोल केले. जपानचा एकमेव गोल काझुमासा मात्सुमोतोने केला. भारताने चौथ्या क्वार्टरमध्ये तीन गोल करून सामन्यावर नियंत्रण मिळवले.
BACK-TO-BACK CHAMPIONS! INDIA DEFEND THEIR CROWN! Team India are crowned champions of the Hero Asian Champions Trophy Punjab 2026 after a commanding 4-1 victory over Japan in the Final! The defending champions deliver when it matters most to retain their title on home soil! Their record-extending 6th ACT title! #HockeyIsBack #HACT2026 #SatSriAkalAsia #IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) November 5, 2026
अंतिम सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या मिनिटालाच काझुमासा मात्सुमोतोने केलेल्या गोलमुळे संघाला 1-0 अशी आघाडी मिळाली. मात्सुमोतोने आपल्या जबरदस्त टोमहॉक शॉटने स्टेडियममधील प्रेक्षकांना थक्क केले. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक चांगल्या संधी निर्माण केल्या, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. 20 व्या मिनिटाला जपानला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, परंतु भारतीय बचावफळीने उत्कृष्ट कामगिरी करत जपानच्या संघाला गोल करण्याची संधीच दिली नाही.
हे ही वाचा
आपला 200 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या भारतीय उपकर्णधार हार्दिक सिंगने मिडफिल्डमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, तर जरमनप्रीत सिंगने भक्कम बचाव करत जपानचे हल्ले परतवून लावले. गुरुवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या सामन्यात, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाने दक्षिण कोरियाला 5-2 ने पराभूत केले, ज्यामध्ये अबू कमाल अर्जाईने दोन गोल केले.