Live क्रिकेट सामन्यात अंपायर सोबत भयानक अपघात, मैदानातच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला
HongKong Sixes : हॉंगकॉंग सिक्सेस 2026 मध्ये भारत विरुद्ध यूएई यांच्यात झालेल्या सामन्यात अंपायरच्या डोक्याला बॉल लागून भयानक घटना घडली. अंपायर मैदानातच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
HongKong Sixes : हॉंगकॉंग सिक्सेस 2026 मध्ये भारतीय संघाचं प्रदर्शन खूपच खराब राहिलं. आधी पाकिस्तान सोबत पराभूत झाल्यावर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव मिळाला. तर शनिवारी झालेल्या भारत विरुद्ध यूएई सामन्यात अंपायर सोबत एक भयानक अपघात घडला. हा अपघात भारतीय गोलंदाज टी नटराजननेद्वारे टाकण्यात आलेल्या पहिल्या ओव्हरमध्ये झाला. लाईव्ह सामना सुरु असताना भयानक अपघात घडून अंपायर मैदानातच बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अंपायरच्या तब्येतीविषयी क्रिकेट फॅन्स काळजी व्यक्त करत आहेत.
भारत विरुद्ध यूएई सामना :
हाँगकाँग सिक्सस स्पर्धेतील 12 वा सामना भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 ओव्हरच्या 94 धावा केल्या. भारतीय संघासाठी टी. नटराजन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 14 बॉल 38 धावा केल्या, ज्यामध्ये 4 सिक्स आणि 3 चौकारांचा समावेश होता. यूएईने 6 विकेट राखून विजय मिळवला आणि 10 बॉल शिल्लक असतानाच विजयाचं टार्गेट पूर्ण केलं. भारतीय गोलंदाज यूएईच्या दोन्ही ओपनर्सपैकी एकालाही बाद करू शकले नाहीत. कर्णधार खालिद शाहने 14 बॉलमध्ये 52 धावा केल्या, तर अंश टंडनने 12 बॉलमध्ये 39 धावांचे योगदान दिले. विशेष म्हणजे हाँगकाँग सिक्सस ही आयसीसीद्वारे मान्यताप्राप्त स्पर्धा असून तिचे आयोजन क्रिकेट हाँगकाँग, चीन द्वारे केले जात आहे. या फॉरमॅटमधील सामन्यात प्रत्येक संघ 6 ओव्हर खेळतो आणि प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात.
अंपायरच्या डोक्यावर लागला बॉल :
यूएईच्या इनिंगच्या पहिल्या ओव्हरमध्ये अम्पायर सोबत एक भयानक अपघात घडला. ही टी नटराजनचा ओव्हर होती ज्यात 5 बॉलवर 19 धावा आल्या होत्या. शेवटचा बॉल एक बाउन्सर होता, जो थेट फलंदाज खालिदच्या डोक्याच्या दिशेने आला. खालिदने आपली बॅट फिरवली आणि बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सिक्ससाठी गेला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे उभा असलेला अंपायर बॉलकडे पाहत नव्हता. योगायोगाने तो बॉल थेट त्याच्या डोक्याला जाऊन लागला.
हेही वाचा : 10 वर्षांचा दुष्काळ संपला... दक्षिण आफ्रिकेने हिसकावले ऑस्ट्रेलियाचे अव्वल स्थान!
अंपायरच्या डोक्याला बॉल लागताच तो जमिनीवर कोसळला. त्याच्या आजूबाजूला असलेले अधिकारी अंपायरच्या दिशेने मदतीसाठी धावले. हे तर स्पष्ट होतं कि अंपायरच्या डोक्याला खूप वेगाने आलेला बॉल लागल्याने दुखापत फार वेदनादायक असेल. मात्र हे लिहिण्याच्या वेळेपर्यंत त्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.