पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे भारतासाठी 'करो या मरो'ची मॅच; समोर कोणता संघ? सेमीफायनलसाठी काय करावं लागणार?
आता भारताच्या संघाला इमर्जिंग आशिया कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी काय करावे लागणार यासंदर्भात संपूर्ण समीकरण सविस्तर वाचा.
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यामध्ये काल सामना पार पडला, इमर्जिंग आशिया कप सेमीफायनलच्या सामन्यामध्ये स्थान पक्के करण्यासाठी भारताच्या संघाला पुढील सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असणार आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये भारताच्या संघाला 48 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. आता टीम इंडियाचा पुढील सेमीफायनलचा मार्ग कठिण झाला आहे, त्यामुळे भारताच्या संघाला यूएईविरुद्ध सामना जिंकावा लागणार आहे. आता भारताच्या संघाला इमर्जिंग आशिया कप 2026 च्या सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी काय करावे लागणार यासंदर्भात संपूर्ण समीकरण सविस्तर वाचा.
आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 च्या 'ब' गटामध्ये पाकिस्तान 'अ', भारत 'अ', नेपाळ आणि युएई हे संघ आहेत. आपले पहिले दोन सामने गमावल्यामुळे युएई स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तान 'अ' आणि भारत 'अ' या दोन्ही संघांनी आपापले पहिले सामने जिंकले. पाकिस्तानी संघाने भारताला हरवून 'ब' गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. भारत 'अ' आणि नेपाळ हे प्रत्येकी 1 विजयासह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताच्या संघाने नेपाळविरुद्ध 306 धावांनी विजय मिळवल्यामुळे संघाला रन रेटचा मोठा फायदा आहे, पण पुढील सामना भारतासाठी महत्त्वाचा असणार आहे.
हे ही वाचा
2 शतके, 4 अर्धशतके; 720 धावा... IND vs NZ सामना अनिर्णित! भारताच्या संघाचा WTC चा मार्ग आणखी कठीण
इंडिया 'अ' संघासाठी उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग सोपा नसेल. इंडिया 'अ' चा पुढचा सामना युएईविरुद्ध आहे आणि जर ते जिंकले, तर नेपाळपेक्षा चांगल्या नेट रन रेटमुळे ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. जर नेपाळ आपला पुढचा सामना हरला, तर इंडिया 'अ' संघ आपल्या उत्तम नेट रन रेटमुळे एकही सामना न जिंकताही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकतो. इंडिया 'अ' च्या विजयाच्या परिस्थितीत, नेपाळला पाकिस्तानविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, जे अशक्य वाटते. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील इंडिया 'अ' संघाला आता कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागेल.
भारताचा संघाच्या प्लेइंग 11 मध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये बदल केला जाऊ शकतो. पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुप स्टेजच्या सामन्यामध्ये काही खेळाडूंची कामगिरी फारच निराशाजनक पाहायला मिळाली. वैभव सूर्यवंशी दोन्हीही सामन्यांमध्ये फेल झाला तर संघाचा उपकर्णधार रिंकू सिंग देखील फार काही करु शकला नाही.