• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /2 शतके, 4 अर्धशतके; 720 धावा... IND vs NZ सामना अनिर्णित! भारताच्या संघाचा WTC चा मार्ग आणखी कठीण

2 शतके, 4 अर्धशतके; 720 धावा... IND vs NZ सामना अनिर्णित! भारताच्या संघाचा WTC चा मार्ग आणखी कठीण

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेचा पहिला सामना हा अनिर्णयीत राहिला, टीम इंडिया शेवटच्या दिवशी 8 विकेट्स घेण्यात अपयशी झाली आणि सामना ड्रॅा घोषित करण्यात आला.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 23, 2026, 10:45 IST|Updated: Nov 23, 2026, 10:59 IST
joinshare
2 शतके, 4 अर्धशतके; 720 धावा... IND vs NZ सामना अनिर्णित! भारताच्या संघाचा WTC चा मार्ग आणखी कठीण

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दररोज कच्चा कांदा खाण्याचे जबरदस्त फायदे; रिसर्चमध्ये समोर आली माहिती

दररोज कच्चा कांदा खाण्याचे जबरदस्त फायदे; रिसर्चमध्ये समोर आली माहिती

2

बिस्लेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित की असुरक्षित? कंपनी म्हणाली, 14 महिन्यापूर्वीच..., FSSAI च्या नोटीसबद्दलही खुलासा

3

2 शतके, 4 अर्धशतके; 720 धावा... IND vs NZ सामना अनिर्णित! भारताच्या संघाचा WTC चा मार्ग आणखी कठीण

4

₹1950 कोटी आज डायरेक्ट खात्यावर होणार जमा; फडणवीसांनी पुढाकार घेतल्याने 13 वर्षांनंतर मोठा दिलासा! नेमकं प्रकरण काय?

5

पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याचा कट, धमकीच्या पत्राने शहर हादरलं! 300 लोकांना मारण्याची धमकी

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिकेचा पहिला सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण दुसऱ्या डावामध्ये न्यूझीलंडच्या संघाने चांगला कमबॅक केला आणि भारताचे गोलंदाज 10 विकेट्स घेण्यामध्ये अपयशी झाले अन् सामना अनिर्णयीत राहिला. डावाने विजय मिळवण्यासाठी भारताला शेवटच्या दिवशी न्यूझीलंडच्या आठ विकेट्स घेणे आवश्यक होते. भारतीय गोलंदाजांनी सर्वोत्तम प्रयत्न केले, पण ते अयशस्वी ठरले. किवी संघाच्या केवळ तीन विकेट्स पडल्या. डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी 258 चेंडूंचा सामना करत सहाव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली.

न्यूझीलंडने आपल्या दुसऱ्या डावात पाच गडी गमावून 239 धावा केल्या. यानंतर, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करून सामना अनिर्णित ठेवण्यास सहमती दर्शवली. भारताच्या संघाची या सामन्यामध्ये फलंदाजी प्रभावी पाहायला मिळाली, या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल, रिषभ पंत, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल यांच्या मोठी खेळीने भारताच्या संघाने पहिल्याच डावामध्ये 700 हून अधिक धावा केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये सांगायचे झाले तर पहिल्या सामन्यामधून मोहम्मद सिराज संघामधून वगळल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

हे ही वाचा

हर्षित राणा आऊट अन् मैदानावर ड्रामा! पाकिस्तानच्या खेळाडूने केला शिवीगाळ, पहा Video

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला असे वाटत होते, कारण हवामान थोडे ढगाळ होते आणि खेळपट्टी गवताने भरलेली होती. भारताने याचा फायदा घेत पहिल्या सत्रात चार बळी घेतले. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडने सामन्यावर नियंत्रण मिळवले. अखेरीस, हेन्री निकोल्सच्या 175 आणि ग्लेन फिलिप्सच्या 118 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 368 धावा केल्या. कसोटी सामना जिंकण्यासाठी २० बळींची आवश्यकता असते. भारतीय संघाने प्रयत्न सुरूच ठेवले, पण अंतिम दिवशी आठ भारतीय गोलंदाजही डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांची भागीदारी तोडू शकले नाहीत.

भारताच्या पहिल्या डावात सुरुवातीपासून शेवटपर्यंत भागीदारी पाहायला मिळाली. भारताने 720/9 धावांवर डाव घोषित केला. केएल राहुलने 136, ऋषभ पंतने 128, कर्णधार शुभमन गिलने 98, यशस्वी जैस्वालने 85, देवदत्त पडिक्कलने 80 आणि ध्रुव जुरेलने 78 धावा केल्या. भारताला ३५२ धावांची आघाडी मिळाली होती.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News