बिस्लेरीचे पाणी पिण्यायोग्य नाही, असं दोन टेस्टच्या रिपोर्टनंतर समोर आल्याचे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) सांगितलं आहे. या रिपोर्टनुसार पाण्यातील ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यामुळे FSSAI ने कंपनीला नोटीस पाठवली असून त्यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. या FSSAI ने पाठवलेल्या नोटीसंदर्भात बिस्लेरी कंपनीकडून निवदेन जाहीर करत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
FSSAI च्या नोटीसबद्दल बिस्लेरी कंपनीच्या निवेदनात खुलासा देण्यात आला आहे. शिवाय कंपनीचे पाणी सुरक्षित असल्याचे सांगितलं आहे. त्यांनी या निवेदनात म्हटलं की, हे प्रकरण सुमारे 14 महिन्यांपूर्वीचे असून, सप्टेंबर 2025 मध्ये बिस्लेरीच्या गोव्यातील उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या एका बॅचशी संबंधित आहे. हा प्रकल्प आमच्या देशभरातील 143 उत्पादन प्रकल्पांपैकी एक आहे.
30 सप्टेंबर 2025 रोजी FSSAI ने गोव्यातील उत्पादन प्रकल्पातून पाण्याचे सहा नमुने गोळा करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीत सहापैकी पाच नमुने सर्व लागू मानकांनुसार योग्य आढळले. मात्र, सहाव्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण प्रतिलिटर 12 मायक्रोग्रॅम आढळले. हे प्रमाण निर्धारित मर्यादा असलेल्या प्रतिलिटर 10 मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त होते. बिस्लेरीने या निष्कर्षाविरोधात अपील केल्यानंतर, 22 नोव्हेंबर 2025 रोजी FSSAI ने संबंधित नमुना पुन्हा तपासणीसाठी संदर्भ प्रयोगशाळेत पाठवला.
संदर्भ प्रयोगशाळेने केलेल्या तपासणीत संबंधित पाण्याच्या नमुन्यातील ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. मात्र, याच तपासणीत नमुन्यामध्ये पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) असल्याचे स्वतंत्रपणे निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही तपासण्यांच्या निष्कर्षांमध्ये फरक असल्याने बिस्लेरीने याबाबत अधिक स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.बिस्लेरीने संबंधित नमुन्याची FSSAI मान्यताप्राप्त स्वतंत्र प्रयोगशाळेत पुन्हा तपासणी करण्याची व्यवस्था केली. या स्वतंत्र तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. बिस्लेरीने स्वतंत्र प्रयोगशाळेतील तपासणीचे निष्कर्ष 2 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत पत्राद्वारे FSSAI च्या पश्चिम विभागीय कार्यालयात सादर केले. या पत्रानंतर FSSAI कडून कोणताही पुढील पत्रव्यवहार प्राप्त झाला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघाले आहे, अशी कंपनीची समजूत झाली.
We are aware of recent media reports that the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) has issued a notice to Bisleri. The matter dates back approximately 14 months, to a batch produced in September 2025 at Bisleri's Goa manufacturing facility, one of 143 plants in our network. On 30 September 2025, FSSAI collected six samples from the Goa facility. Initial testing found that five samples met all applicable standards. The sixth recorded a bromate level of 12 micrograms per litre, against the prescribed limit of 10 micrograms per litre. Following Bisleri's appeal dated 22 November 2025, FSSAI sent that sample to a referral laboratory for retesting. The referral laboratory found bromate in the sample within the prescribed limit and separately flagged polynuclear aromatic hydrocarbons (PAHs) in the sample. The difference between the two results raised questions that Bisleri believed warranted clarification. Bisleri arranged for the same sample to be tested independently at an FSSAI-approved laboratory. That test found bromate within the prescribed limit. We submitted the independent test results to FSSAI's Western Regional Office with a formal letter dated 2 February 2026. We received no further communication from FSSAI after that submission and understood the matter to be closed. To date, Bisleri has received no notice by email or in hard copy and has been unable to locate the reported notice on FSSAI's website. Drinking water safety is a priority for Bisleri. We maintain stringent quality controls of over 90 tests across our 10-step manufacturing process and will continue to cooperate with FSSAI to address the matter through the appropriate regulatory process. A trusted brand for years, Bisleri remains safe for consumption: Bisleri
— IANS (@ians_india) November 23, 2026
आजपर्यंत बिस्लेरीला ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष स्वरूपात कोणतीही नोटीस मिळालेली नाही. तसेच FSSAI च्या संकेतस्थळावरही माध्यमांमध्ये उल्लेख करण्यात आलेली नोटीस शोधता आलेली नाही, असे कंपनीने स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही बिस्लेरीसाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही उत्पादन प्रक्रियेत कठोर गुणवत्ता नियंत्रणाचे पालन करतो. आमच्या दहा टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेत 90 पेक्षा अधिक चाचण्या केल्या जातात. संबंधित प्रकरण योग्य नियामक प्रक्रियेद्वारे सोडवण्यासाठी आम्ही FSSAI सोबत सहकार्य करत राहू. अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास संपादन केलेला बिस्लेरी ब्रँड पिण्यासाठी सुरक्षित असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
50 वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेल्या बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने भारतातील प्रमुख प्रीमियम पेय उत्पादक कंपन्यांपैकी एक म्हणून स्थान निर्माण केले आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँडची निर्मिती करणाऱ्या बिस्लेरीकडून पाण्याच्या शुद्धतेसाठी दहा टप्प्यांची प्रक्रिया आणि 90 गुणवत्ता चाचण्यांचे पालन केले जाते. कंपनीची मूलभूत मूल्ये ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि आरोग्यदायी पाणी उपलब्ध करून देण्याशी संबंधित आहेत.
बिस्लेरी इंटरनॅशनलचे भारतात 143 कार्यरत उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीकडे 6,000 हून अधिक वितरक आणि 7,500 वितरण ट्रकचे मजबूत नेटवर्क आहे. कंपनी विविध प्रसंगांसाठी वेगवेगळ्या प्रकारची पेये तयार करते.
बिस्लेरी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरसोबतच कंपनीच्या उत्पादनांमध्ये पुढील ब्रँडचा समावेश आहे.
- वेदिका हिमालयन स्प्रिंग वॉटर
- बिस्लेरी लिमोनाटा
- बिस्लेरी पॉप
- बिस्लेरी सोडा
ही उत्पादने वेगवेगळ्या चवी आणि प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.
याशिवाय, बिस्लेरी इंटरनॅशनलने बिस्लेरी डोअरस्टेप या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे घरपोच सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ग्राहकांना त्यांच्या विश्वासातील ब्रँडचा सुरक्षित आणि अखंडित पुरवठा घरपोच मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे. बिस्लेरी इंटरनॅशनलची मूलभूत मूल्ये व्यवसायाच्या प्रत्येक क्षेत्रात जबाबदारीने काम करणे, विकास साधणे आणि शाश्वततेला प्राधान्य देणे ही आहेत.