SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ICC Rankings मध्ये सहाव्या क्रमांकावर पोहोचली अफगाणिस्तान, श्रीलंकेची घसरण; भारताचा क्रमांक कितवा?

ICC Ranking : आयसीसी पुरुष वनडे टीमची ताजी रँकिंग समोर आली असून यात अफगाणिस्तानचा संघ हा सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंडचा संघ हा 109 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. तेव्हा आयसीसी रँकिंगमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी याची टॉप १० लिस्ट पाहा.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 02, 2026, 09:09 PM IST | Updated: Nov 02, 2026, 09:49 PM IST
Image Credit: RCB ला सलग दोनदा IPL चॅम्पियन बनवणारा रजत पाटीदार बनला इंडिया A चा उपकर्णधार
Join

ICC Ranking : आयसीसी पुरुष वनडे टीम रँकिंगमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघ सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. हा संघ श्रीलंकेच्या पुढे गेला आहे. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोच्च रँकिंग आहे. भारतीय क्रिकेट संघ 4122 गुण आणि 115 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. न्यूझीलंड 3809 गुण आणि 109 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट संघात 2009 मध्ये आपला पहिला वनडे सामना खेळला होता. आता 17 वर्षांमध्ये त्याचा प्रवास हा चांगला राहिला. फक्त वनडे नाही तर टी20 मध्ये प्रोग्रेस स्पष्ट दिसून आली. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव केला. 2024 मध्ये ते पहिल्यांदाच टी20  वर्ल्ड कपच्या सेमी फायनल सामन्यापर्यंत पोहोचले. या काळात संघाने इतरही अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. आयसीसीने सांगितलं की अफगाणिस्तान क्रिकेट संघाने 191 वनडे सामन्यापैकी 96 सामन्यात त्यांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानचा संघ इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि बांगलादेशसारख्या संघांच्या आधीच पुढे होता आता त्याने श्रीलंकेला मागे टाकून ते सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

काही दिवसांपूर्वी खेळण्यात आलेल्या सीरिजबाबत बोलायचं झालं तर आयर्लंड विरुद्ध 4-0 ने सीरिज जिंकली आहे. झिम्बाब्वे आणि बांगलादेश सोबत झालेल्या ट्रे सीरिजमध्ये कोणीही सामन्यात पराभूत झालेला नाही. आयसीसी पुरुष वनडे टीम रँकिंगमध्ये टॉपवर भारत आहे तर दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. 104 रेटिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या 102 रेटिंग पॉइंट्स आहे. ही संघ टॉप 5 मध्ये आहे.

हेही वाचा : RCB ला सलग दोनदा IPL चॅम्पियन बनवणारा रजत पाटीदार बनला इंडिया A चा उपकर्णधार
 

आईसीसी वनडे संघाची रँकिंग :

भारत
न्यूझीलंड 
साउथ अफ्रीका
पाकिस्तान 
ऑस्ट्रेलिया
अफगानिस्तान
श्रीलंका
इंग्लंड 
बांग्लादेश 
वेस्टइंडीज

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES