IND vs NEP : प्रिन्स यादव आणि हर्षित राणा नेपाळला 26 धावांवर गुंडाळलं! भारताचा 306 धावांनी विजय
इमर्जिंग आशिया कप 2026 चा भारताचा पहिला ग्रुप स्टेजचा सामना नेपाळविरुद्ध पार पडला, या सामन्यामध्ये भारत अ संघाने 306 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
इमर्जिंग आशिया कप 2026 चा भारताचा पहिला ग्रुप स्टेजचा सामना नेपाळविरुद्ध पार पडला, या सामन्यामध्ये भारत अ संघाने 306 धावांनी विजय मिळवला आहे. भारताच्या संघाने नेपाळला एकतर्फी विजय मिळवून या स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे, टीम इंडियाचे गोलंदाज प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी संघासाठी कमालीची कामगिरी केली आणि नेपाळला सामन्यामध्ये कमबॅक करण्याची पहिल्या ओव्हरपासून संधी दिली नाही. भारताची सुरुवात या सामन्यामध्ये चांगली झाली नाही पण संघाने सामन्यामध्ये दमदार कमबॅक केला आणि पहिला सामना हा सहज जिंकला. आता या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजी आणि फलंदाजांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
हर्षित राणा आणि प्रिन्स यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने नेपाळला अवघ्या 26 धावांत गुंडाळले. प्रिन्सने या सामन्यामध्य सहा धावा देत पाच विकेट्स नावावर केले, तर हर्षित राणाने 16 धावांत चार विकेट्स घेतले. कुमार कुशाग्र आणि कर्णधार तिलक वर्मा यांच्या शतकांमुळे भारताने यापूर्वी नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. भारतीय संघाचा पुढील सामना हा पाकिस्तानविरुद्ध होणार आहे, हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे, भारताच्या संघाला सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी आणखी एक विजयाची गरज आहे.
हे ही वाचा
4,4,4,4,4,4,4,4,4,6,6... कुशाग्र-तिलकची खेळी भारतासाठी वरदान! टी20 चे स्टार नेपाळविरुद्ध फेल
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर अभिषेक शर्माचा पहिला धक्का भारताच्या संघाला लागला. अभिषेक शर्माने 9 धावा केल्या आणि बाद झाला तर वैभव सूर्यवंशीने संघासाठी 26 धावा केल्या, यामध्ये त्याने 3 चौकार 1 षटकार मारले. तर आयुष बडोनी देखील नेपाळच्या गोलंदाजीसमोर पूर्णपणे फेल झाला. कुमार कुशाग्र आणि भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा या दोघांची खेळी संघासाठी ट्रम्प कार्ड ठरली. कुमार कुशाग्रने कर्णधार तिलक वर्मासोबत मिळून भारतीय डावाला स्थैर्य दिले. या दोन फलंदाजांनी 191 चेंडूंमध्ये 206 धावांची शानदार भागीदारी चौथ्या विकेटसाठी केली.
तिलकने शतक झळकावून आपल्या फलंदाजीचे कौशल्यही दाखवले. कुशाग्र बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 4 गडी बाद 248 होती. नेपाळी गोलंदाज ललित राजवंशीने त्याला क्लीन बोल्ड करून हा प्रभावी डाव संपुष्टात आणला. संघ अडचणीत असल्याचे दिसत होते, परंतु कुमार कुशाग्र आणि तिलक वर्मा यांनी शानदार फलंदाजी करून भारताला सामन्यात परत आणले. त्यांच्या शतकांनी नेपाळी गोलंदाजांचे सुरुवातीचे प्रयत्न निष्फळ ठरवले.