SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वनडे सीरिजपूर्वी टीम इंडियाचा संघ बदलला, प्रसिद्ध कृष्णा झाला बाहेर, 'या' खेळाडूला संधी

IND VS NZ ODI Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे सीरिज खेळवली जाणार असून यात प्रसिद्ध कृष्णा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या उपलब्धतेविषयी माहिती समोर येत आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 30, 2026, 02:36 PM IST | Updated: Oct 30, 2026, 03:09 PM IST
Image Credit: वनडे सीरिजपूर्वी टीम इंडियाचा संघ बदलला, प्रसिद्ध कृष्णा झाला बाहेर, 'या' खेळाडूला संधी
Join

IND VS NZ ODI Series : सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी20 सीरिज खेळवली जात आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. मात्र या सीरिजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून या सीरिजमधून भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा बाहेर पडला आहे. यापूर्वी असं बोललं जातं होतं की प्रसिद्ध कृष्णा हा  सीरिजच्या अंतिम दोन सामन्यात खेळू शकतो. मात्र आता यावर पूर्णविराम लागला आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डी ज्याला पाच सामन्यांसाठी निवडण्यात आलं होतं. आता तो फक्त एक सामना खेळणार आहे. क्रिकेबझच्या रिपोर्टनुसार प्रसिद्ध कृष्णाच्या रिप्लेसमेंटची घोषणा करण्यात आलेली नाही. प्रसिद्धला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.

न्यूझीलंडच्या विरुद्ध वनडे सीरिजसाठी जेव्हा संघाची घोषणा करण्यात आली प्रसिद्ध कृष्णाला संघात सहभागी करण्यात आलेलं होतं. मात्र वेळेत त्याची दुखापत पूर्ण न झाल्याने तो संघातून बाहेर पडला आहे. आनंदाची बातमी अशी की तो न्यूझीलंड 'ए' विरुद्धच्या तिसऱ्या अनऑफिशियल टेस्ट सामन्यासाठी 'इंडिया ए' संघात सामील होईल. मात्र टेस्ट सीरिजचा विचार करता प्रसिद्ध कृष्णाला 'रिटर्न-टू-प्ले' चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.

नितीश रेड्डी आता फक्त एक सामन्यात खेळणार :

प्रसिद्ध कृष्णा ऐवजी नितीश कुमार रेड्डीबाबत आता अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे. नितीश कुमार रेड्डी आता टीम इंडियासाठी न्यूझीलंड विरुद्ध सर्व वनडे सामने खेळणार नाही. सुरुवातीला त्याला संपूर्ण मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु आता 4 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यानंतर तो 'इंडिया ए' संघात सामील होईल. 'इंडिया ए' आणि 'न्यूझीलंड ए' यांच्यातील तिसरा अनऑफिशियल टेस्ट सामना 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 19 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय संघाने नितीश रेड्डीला तयार करण्यास सुरुवात केली आहे.

वनडे सीरिजसाठी भारतीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, रुतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, ईशान किशन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी.

चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (उपकर्णधार), अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर बराड़, रुतुराज गायकवाड़, अर्शदीप सिंह, कुमार कुशाग्र, मोहम्मद सिराज, यश ठाकुर, कुलदीप यादव.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES