शाळा बुडवून गेले मॅच पाहायला, चोरी कॅमेऱ्यामध्ये कैद! कॅमेरामनची नजर अन्; Video viral
झालेल्या भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला, सोशल मिडियावर या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये मालिकेचा पहिला कसोटी सामना पार पडला, या सामन्यामध्ये दोन्ही संघांला विजय मिळवण्यात अपयश आले. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये मोठी धावसंख्या उभारली होती पण त्यानंतर दुसऱ्या डावामध्ये न्यूझीलंडच्या संघाने चांगला कमबॅक केला. झालेल्या भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये एक मजेशीर किस्सा पाहायला मिळाला, या सामन्यामध्ये शाळकरी मुलांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला नाही त्यामुळे त्यांना नक्कीच त्यांच्या आईचा मार खायला लागू शकतो. सामनादरम्यान ही घटना घडली आणि अनेकांना हासू आवरले नाही नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
पहिल्या कसोटीच्या शेवटच्या म्हणजेच पाचव्या दिवशी काही मुलांनी शाळा बुडवून बेसिन रिझर्व्ह येथे सामना पाहिला. आपल्यावर कोणाचेही लक्ष जाणार नाही याची त्यांना कल्पना नव्हती आणि त्यांचे संपूर्ण लक्ष सामन्यावर केंद्रित होते. अचानक, कॅमेरामॅनची नजर मुलांवर पडली. मोठ्या स्क्रीनवर त्यांचे चेहरे दिसताच, ते गोंधळून गेले. व्हिडिओमधील समालोचक असे म्हणताना ऐकू येतो की, मुले शाळेत जाण्याऐवजी अभ्यास सोडून सामना बघायला आल्यामुळे पकडली गेली आहेत. स्क्रीनवर मुलांना पाहणारे सर्वजण खळखळून हसले. एक मुलगा तर काही तरी खात होता आणि कॅमेऱ्यावर दिसताच ती शाळकरी मुले तोंड लपवत होती.
सोशल मिडियावर या शाळकरी मुलांचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना हा अनिर्णयित राहिला आणि सामना ड्रॅा घोषित करण्यात आला. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. किवी संघाने पहिले फलंदाजी करुन 368 धावा पहिल्या डावामध्ये केल्या, ऋषभ पंत, केएल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने 9 गडी गमावून 720 धावांवर आपला डाव घोषित केला.
हे ही वाचा
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे भारतासाठी 'करो या मरो'ची मॅच; समोर कोणता संघ? सेमीफायनलसाठी काय करावं लागणार?
भारतीय संघाची गोलंदाजी या सामन्यामध्ये एवढी काही प्रभावी पाहायला मिळाली नाही, रिषभ पंतने संघासाठी शतक ठोकले तर केएल राहुलने देखील संघासाठी शतक झळकावले. भारतीय संघाची पहिल्या डावामध्येच मोठी आघाडी होती संघ सामना जिंकेल अशी परिस्थिती होती पण शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या हाती विकेट्स लागले नाही आणि सामना बरोबरीत करण्यात आला.