शतक ठोकलं पण सामना गमावला, पाकिस्तानविरुद्ध भारताचा 48 धावांनी पराभव!
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यामध्ये एकदिवसीय इमर्जिंग आशिया कप 2026 चा सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पाकिस्तानविरुद्ध 48 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यामध्ये काल सामना पार पडला, या सामन्यामध्ये भारताच्या संघाला 48 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये भारताच्या संघाच्या खराब फलंदाजीमुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाची मजबूत फलंदाजी पाहायला मिळाली, पाकिस्तानच्या संघाने भारताला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये स्थान जवळजवळ पक्के केले आहे. या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा, शेहजाद अहमद आणि भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्माने संघासाठी चांगली कामगिरी केली. या सामन्यामध्ये भारतीय संघाचे पराभवाचे कारण काय यासंदर्भात सविस्तर सामन्याचा आढावा घ्या.
भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने पहिले गोलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावापासूनच आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावामध्ये सलामीवीर फलंदाजांचे मोलाचे योगदान राहिले. या सामन्यामध्ये हर्षित राणाने दोन विकेट्स घेतले पण तो संघासाठी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याचबरोबर पाकिस्तानच्या हसीन नवाजने संघासाठी 79 धावांची खेळी खेळली. अंडर 19 संघाचा कर्णधार फरहान युसूफ याने संघासाछी 56 धावांची खेळी खेळली. पहिले फलंदाजी करत पाकिस्तानच्या संघाने 313 धावा केल्या होत्या.
हे ही वाचा
हर्षित राणा पाकिस्तानच्या फलंदाजांशी भिडला, पंचाना करावा लागला हस्तक्षेप! पहा Video
पाकिस्तानच्या संघाने 313 धावा केल्या होत्या हे लक्ष्य भारताच्या संघाला पार करता आले नाही, भारताच्या संघाला पाकिस्तानने 265 धावांवर सर्वबाद केले. भारताच्या संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर वैभव सूर्यवंशी भारतीय संघासाठी आणखी एकदा फेल झाला. तर अभिषेक शर्माने मैदानावर टिकून संघासाठी 42 चेंडूमध्ये 70 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 6 षटकार आणि 6 चौकार मारले. आयुष बडोनी आणखी एकदा शून्यावर बाद झाला आणि संघाला दुसरा मोठा धक्का बसला. भारतीय संघाचा कर्णधार तिलक वर्माने संघासाठी सामन्याच्या शेवटपर्यत टिकून शतक ठोकले पण तो संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरला.
मागील सामन्यामध्ये शतकवीर कुमार कुशाग्र पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये पूर्णपणे फेल झाला. तर रिंकू सिंग देखील 6 धावा करुन बाद झाला, सूर्यांश शेंडगेने देखील संघासाठी फार काही मोठी खेळली नाही. गोलंदाजीमध्ये सांगायचे झाले तर हर्षित राणा, प्रिन्स यादव, सुर्यांश शेंडगे आणि विप्रज निगम यांनी संघासाठी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. तर आयुष बडोनी संघाला एक विकेट मिळवून दिला.