भारतासमोर पाकिस्तानचे मोठे आव्हान, टीम इंडियाला विजयासाठी 314 धावांची गरज!
भारत पाकिस्तान सामन्याचा पहिला डाव पार पडला, या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिले फलंदाजी करुन पाकिस्तानच्या संघाने भारतासमोर 314 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत अ विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु आहे या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने पहिल्या डावामध्ये फलंदाजी करुन 320 धावा केल्या, याचा अर्थ पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये विजय मिळवून भारताच्या संघाला 321 धावांची गरज आहे. भारताच्या संघासमोर पाकिस्तानचे 321 धावांचे मोठे आव्हान असणार आहे त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा भारतीय संघाला कशी सुरुवात करुन देतील यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. आजच्या पहिल्या डावामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
पहिल्या डावातील भारताच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर भारताच्या संघासाठी आजच्या सामन्यामध्ये विप्रज निगमने 2 विकेट्स नावावर केले तर हर्षित राणा आजच्या सामन्यामध्ये महागडा ठरला पण त्याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. सूर्यांश शेंडगेने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले आणि प्रिन्स यादवने देखील संघासाठी दोन विकेट्स घेतले. आयुष बडोनीने संघाला पहिला विकेट कठीण काळामध्ये मिळवून दिला आणि त्यानंतर टीम इंडियाने सामन्यामध्ये कमबॅक केला.
हे ही वाचा
भारत पाकिस्तान सामन्यात नाणेफेकीच्या वेळी ड्रामा! क्रिकेट प्रेझेंटरकडून मोठी चूक
पाकिस्तान 'अ' संघाने भारताविरुद्ध दमदार सुरुवात केली आणि एके वेळी 250 पेक्षा जास्त धावा करेल असे वाटत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत पाकिस्तानला 49.2 षटकांत 313 धावांवर गुंडाळले. पाकिस्तानकडून माझ सदाकत 59 धावा, हसन नवाझ 79 धावा आणि फरहान युसूफ 56 यांनी अर्धशतके झळकावली. भारतीय संघाकडून हर्षित राणा, प्रिन्स यादव, सूर्यांश शेडगे आणि विप्रज निगम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. आयुष बडोनीनेही एक बळी घेतला. सामना जिंकण्यासाठी भारत 'अ' संघाला 314 धावांची गरज आहे.
भारताच्या संघाला आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवून सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करण्याची संधी असणार आहे. भारत 'अ' संघाने नेपाळला 306 धावांनी पराभूत करून स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती, तर पाकिस्तान 'अ' संघानेही युएई रो संघाला ६१ धावांनी पराभूत करून विजयाने सुरुवात केली होती. पाकिस्तानपेक्षा चांगल्या नेट रन रेटच्या आधारावर भारत 'ब' गटाच्या गुणतालिकेत अग्रस्थानी आहे.