टीम इंडियाची नजर एकदिवसीय मालिकेवर, वाचा IND vs ZIM मालिकेची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार?
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे, या मालिकेचा पहिला सामना हा काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यांची संपूर्ण माहिती सविस्तर वाचा.
भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला यांच्यामध्ये नुकतीच टी20 मालिका पार पडली, या मालिकेमध्ये भारताच्या महिला संघाने झिम्बाब्वेच्या महिला संघाला एकतर्फी रायपूरमध्ये पराभूत केले आणि मालिका जिंकली. आता टीम इंडिया झिम्बाब्वे महिला संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे, या मालिकेचा पहिला सामना हा काही तासांमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्या सामन्यांची संपूर्ण माहिती सविस्तर वाचा.
कधी सुरु होणार सामना?
भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा पहिला सामन्याचे आयोजन हे 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे. वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हा सामना खेळवला जाणार आहे, टीम इंडियाने नुकतीच भारतीय महिला संघाने नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. स्मृती मानधनाच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने पहिली टी20 मालिका जिंकली आहे, आता एकदिवसीय मालिकेमध्ये देखील भारतीय महिला संघ वर्चस्व गाजवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. आता या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंगची संपूर्ण माहिती देखील वाचा.
हे ही वाचा
हॅरी ब्रुकने मोडला शुभमन गिलचा रेकॅार्ड, श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ठोकले सर्वात जलद द्विशतक
भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला या सामन्याला सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता होणार आहे. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार हे 1.30 वाजता मैदानात येतील. टेलिव्हिजनवर होणार या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे, तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहॅाटस्टारवर पाहता येणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग जिओहॅाटस्टारवर 1.00 वाजता सुरु होईल.
भारताचा महिला एकदिवसीय संघ
स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), रिचा घोष (विकेटकिपर), यास्तिका भाटिया (विकेटकिपर), शफाली वर्मा , प्रतिका रावल , हरमनप्रीत कौर , हरलीन देओल , तेजल हसबनीस , सायली सातघरे, वैष्णवी शर्मा , नंदनी शर्मा , श्रीचरणी, क्रांती गौड , जिंतिमाणी कलिता
झिम्बाब्वेचा संपूर्ण एकदिवसीय संघ
जोसेफिन न्कोमो (कॅप्टन), मॉडेस्टर मुपचिक्वा , चिएड्झा धुरुरु, केलीस एनधलोवू , चिपो मुगेरी-तिरिपानो , प्रिय बिझा , शार्ने मेयर्स , न्याशा ग्वांझुरा, मिशेल मावुंगा , नोमवेलो सिबांडा , फ्रान्सिस्का चिपारे , ऑलिंदर चारे , कुडझाई चिगोरा , तेंडाई मकुशा , लॉरिन फिरी